Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असलेल्या ६ मुलांना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात ट्रकने चिरडलं. या दुर्घटनेत ४ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर दोघांवर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संतापजनक बाब म्हणजे, या अपघातात दोन मुलांचा मृत्यू घटनास्थळीच झाला, तर उर्वरित दोन मुलांचा गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर काटली गावात शोककळा पसरली असून, संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




व्यायामासाठी गेलेल्या मुलांचा मृत्य


मिळालेल्या माहितीनुसार, ही ६ मुले रस्त्यावर व्यायाम करत होती, मात्र अचानक भरधाव ट्रकने सहा मुलांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान गडचिरोली जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर गंभीर अवस्थेत नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या या मुलांवर काळाने घाला घातल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.



गडचिरोली अपघातग्रस्त कुटुंबांना ४ लाखांची मदत




गडचिरोलीतील भीषण अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हंटल, “गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर झालेल्या अपघातात चार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.” फडणवीस पुढे म्हणाले की, “अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या एक तासात त्यांना पुढील उपचारासाठी हलवले जाईल.” राज्य सरकारकडून जखमींच्या संपूर्ण उपचाराचा खर्च उचलण्यात येणार असल्याचीही माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.


Comments
Add Comment

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर