RBI: थोड्याच वेळात बहुप्रतिक्षित आरबीआय पतधोरण समितीचा निकाल 'असा' असू शकतो

मोहित सोमण:आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा थोड्याच वेळात आपला वित्तीय पतधोरण समितीचा (MPC) निकाल जाहीर करतील. ४ ते ६ ऑगस्टपर्यंत आज वित्तीय पतधोरण समितीची बैठक होणार होती. आज तिची सांगता होणार असल्याने आरबीआय चे (RBI) गर्व्हनर आपला समितीने व्याजदराबाबत बहुमताने घेतलेल्या निकालाची घोषणा करतील. आज रेपो दरात (Repo Rate) मध्ये काही बदल होतो के हे पाहणे आज संयुक्तित ठरेल.सहा सदस्यांची ही समिती आपला निकाल देईल. या निकालाचा आगामी अर्थव्यवस्थेतील ग्रोथ सायकलवर परिणाम होणार आहे. दर दोन महिन्यांनी वित्तीय समिती आपल्या रेपो व्याजदराबाबत निर्णय घेत असते. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयच्या आगामी रेपो दरात २५ बेसिस पूर्णांकाची कपात अपेक्षित आहे याखेरी ज आगामी दिवाळी व सणासुदीच्या काळात क्रेडिट ग्रोथ होण्यासाठी दरकपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.


एसबीआयच्या अहवालात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की ' ऐतिहासिक आकडेवारीवरून स्पष्ट ट्रेंड दिसून येतो की दिवाळीपूर्वी रेपो दरात कपात केल्यास उत्सवाच्या काळात कर्ज वाढ वाढते. त्यात म्हटले आहे 'आम्हाला अपेक्षा आहे की आरबीआय ऑगस्टमध्ये २५ बेसिस पॉइंट्स कपात करून आघाडीवर राहील.'मागील उदाहरणाचा उल्लेख करून, अहवालात असे म्हटले आहे की ऑगस्ट २०१७ मध्ये २५ बेसिस पॉइंट्स रेपो दरात कपात केल्याने दिवाळीच्या अखेरीस १,९५६ अब्ज रुपयांची वाढीव क्रेडिट वाढ झाली, यातील जवळजवळ ३० टक्के वाढ वैयक्तिक कर्जांमधून झाली. त्यात असेही म्हटले आहे की, भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या दिवाळीत ग्राहकांचा खर्च वाढला आहे आणि सणापूर्वी कमी व्याजदराचे वातावरण असल्याने कर्जाची मा गणी सुधारण्यास मदत होते.


जूनमध्ये झालेल्या मागील बैठकीत, आरबीआयने रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सची कपात करून तो ५.५ टक्क्यांपर्यंत खाली आणून आश्चर्यकारक पाऊल उचलले होतेच तसेच या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले होते की महागाई कमी झाल्या मुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, जवळच्या आणि मध्यम मुदतीच्या दोन्ही अंदाज आरबीआयच्या लक्ष्य मर्यादेत येतात. त्यांनी असेही नमूद केले की अन्न महागाई नियंत्रणात आहे.


आगामी घोषणेमुळे सणासुदीच्या हंगामापूर्वी आर्थिक वाढीला पाठिंबा देण्याच्या मध्यवर्ती बँकेच्या दृष्टिकोनावर अधिक स्पष्टता मिळण्याची अपेक्षा आहे. रेपो दरात कपात झाल्यास मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेतील तरलतेला (Liquidity) ला चालना मिळेल. तसेच वाढलेल्या क्रेडिट मुळे घरकर्ज हप्त्यातील व्याजदरात कपात झाल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. दरम्यान यापूर्वी जून महिन्यात आरबीआयच्या वित्तीय पतधोरण समितीची निकाल जाहीर झाला होता ज्यामध्ये ५० बेसिस पूर्णांकाने रेपो दरात कपात केल्याने व्याजदर ६% वरून ५.५०% झाला.त्यापूर्वी सहा वेळा रेपो दरात कुठलाही बदल झाला नव्हता. या मागील ५० बेसिस पूर्णांकाने कपात केल्याच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेतील तरलतेला चालना मिळाली होतीच पण त्या व्यतिरिक्त चलन पुरवठा वा ढल्याने बाजारातील ग्राहकांच्या क्रमशक्तिला चालना मिळण्याबरोबरच अर्थव्यवस्था संतुलित होण्यास मदत झाली होती.


याशिवाय आरबीआयच्या निर्णयावर टेरिफ वाढीचाही सांगोपांग विचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरबीआय सणासुदीच्या काळात रेपो दरात कपात करतात का भविष्याकालीन तरतूद म्हणून रेपो दर स्थिर ठेवतात याकडे आज बाजाराचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

महाआघाडीत खळबळ; भाजपकडून ‘स्वबळा’ची भूमिका ?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटावर भाजपने स्वबळावर पुढे जाण्याचे संकेत पुन्हा स्पष्ट केल्यानंतर

माजी गृहमंत्र्यांचा मुलगा भाजपच्या वाटेवर ?

नागपूर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळ ऑपरेशनल हे आहे विमानांचे वेळापत्रक एका क्लिकवर !

प्रतिनिधी:अखेर २५ डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान उड्डाण घेणार आहे. पहिले विमान

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

सायबर फसवणुकींचे नवे डावपेच: सर्वसामान्यांवर वाढता धोका त्यापासून कसे वाचाल फेडेक्सने काय म्हटले? वाचा ....

मुंबई: सायबर गुन्हे आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतक्या वेगाने बदलत चालले आहेत आणि घोटाळेबाज आता अत्यंत

Tamhini Ghat : २० दिवसांपूर्वीची नवी 'थार' ५०० फूट दरीत! कोकणात निघालेल्या ४ मित्रांवर काळाचा घाला; दोन दिवसांनी घटना उघडकीस

रायगड : पुण्यावरून कोकणात पर्यटनासाठी निघालेल्या चार मित्रांवर रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात