राहुल गांधींना सशर्त जामीन

चाईबासा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात हजर झाल्यानंतर सशर्त जामीन मिळाला. खटल्यात सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने राहुल गांधींना जामीन दिला.

राहुल गांधी यांनी २८ मार्च २०१८ रोजी एका सार्वजनिक भाषणादरम्यान भाजपचे त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात टिप्पणी केली होती. या टिप्पणी प्रकरणी भाजप नेते प्रताप कुमार यांनी जुलै २०१८ मध्ये झारखंडच्या चाईबासा सीजेएम कोर्टात राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीला राहुल गांधी गैरहजर होते. अखेर न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले.

चाईबासा न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांनी झारखंड उच्च न्यायालयात दाद मागितली. झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधींना ६ ऑगस्ट रोजी चाईबासा न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. या निर्देशांचे पालन करत राहुल गांधी बुधवार ६ ऑगस्ट २०२५ रोजी झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात हजर झाले. यानंतर खटल्यात सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने राहुल गांधींना जामीन दिला.
Comments
Add Comment

निर्यातक्षम राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर

नीती आयोगाच्या निर्यात निर्देशांकात तामिळनाडू मागे नवी दिल्ली : नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक -

गिफ्ट सिटीमध्ये १५ देशांच्या परकीय चलनांमध्ये करता येतात व्यवहार

भारतातील एक शहर जिथे रुपयांऐवजी वापरले जाते परकीय चलन नवी दिल्ली : आपल्याला भारतात कोठेही उद्योग करायचा असेल तर

मणिकर्णिका घाटावर बुलडोजर

दोन खासदारांसह अनेकांवर गुन्हा वाराणसी : वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

बदरी-केदारसह चारधाममध्ये मोबाईल बंदी ,प्रशासनाची रील आणि फोटोवर कडक नजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेची मर्यादा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी यावर्षी

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष

प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर 'गणेशोत्सवा'चा भव्य चित्ररथ नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : राजधानी नवी दिल्ली

भाजप हीच देशाची पहिली पसंती: पंतप्रधान मोदी

सुशासनासाठी जनतेचा विक्रमी जनादेश! देशाला आता केवळ विकास आणि 'गुड गव्हर्नन्स' हवा दिसपुर (वृत्तसंस्था): आज भाजप