आरबीआयचा निर्णय जाहीर होताच फार्मा व रिअल्टी शेअर्स धडाधडा कोसळले

  49

मोहित सोमण: आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजाराने आपले स्वरूप बदलल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत शेअर बाजार घसरले. फार्मा (१.०६%), आयटी (१.५७%), रिअल्टी (२.३५%) समभागात मोठी धूळधाण उडाली आहे. रेपो दर ५.५०% वर स्थिर ठेव ण्याचा निर्णयानंतर शेअर बाजाराने मात्र नकारात्मक कौल दिला आहे. डीएलएफ (३.०६%), लोढा डेव्हलपर (१.६०%), प्रेस्टिज इस्टेट (३.९८%), गोदरेज प्रॉपर्टी (२.१८%), ओबेरॉय रिअल्टी (१.२७%), ब्रिगेड एंटरप्राईजेस (२.०५%), अनंत राज (१.५५%) सनटे क रिअल्टी (२.७१%), रेमंड रिअल्टी (६.६९%) अशा अनेक शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. फार्मा समभागातही मोठी घसरण झाली ज्यात सनफार्मा (१.०५%), डिवीज (२.१७%), टोरंट (१.६९%), सिप्ला (१.५६%), झायडस लाईफ सायन्स (२.०८%), ग्लेन मार्क (१.८३%), बायोकॉन (२.२८%), लारूस (३.०९%) समभागात घसरण झाली आहे. आरबीआयच्या ५.५०% रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय झाल्याने व टेरिफ अनिश्चिततेचा फटका या शेअर्सला मोठ्या प्रमाणात बसला आहे. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल टप्याटप्याने २५०% टेरिफ वाढवण्याचे काल संकेत दिल्याने फार्मा शेअर्समध्ये घसरण झाली आहे. दुसरीकडे रेपो दरात व्याजदरात कपात न झाल्याने कर्ज स्वस्त होण्याची शक्यता मावळली आहे.याचा परिणाम म्हणून रिअल्टी समभागात मोठ्या प्रमाणात घ सरण झाली आहे.

सध्या फार्मा टेरिफ 'जैसे थे' असले तरी ते टप्याटप्याने वाढणार असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. त्यामुळे ते आगामी वर्षात १०० टक्के मग २५०% इतक्या प्रमाणात वाढणार असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. त्यामुळे इतरही क्षेत्रात २५% टेरिफ वाढल्याने त्याचा परिणाम एक त्रित परिणाम फार्मा शेअर्समध्ये झाला. अरबिंदो फार्मा, डॉ रेड्डीज यांसारख्या कंपन्यांचा अर्ध्याहून अधिक महसूल युएस बाजारातून येतो. भारतातील फार्मा कंपन्याचे युएस मोठा आयातदार आहे. त्यामुळे या शेअर्सच्या गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण काय म आहे. दुसरीकडे दरकपात रोखली गेल्यानं रिअल्टी शेअर्समध्ये दबाव वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सेल ऑफ वाढले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. एका अहवालानुसार, टेक्सटाईल क्षेत्रावरही दबाव निर्माण झाला आहे. चीन व व बांगलादेश यांच्याक डून मिळणाऱ्या महसूलात घट होण्याची शक्यता असल्याने टेक्सटाइल समभागातही गेल्या आठवड्यात दबाव होता जो आगामी काळात कायम राहू शकतो.

शुक्रवारी भारतीय औषध कंपन्यांचे शेअर्स कोसळले. निफ्टी फार्मा इंडेक्स एकाच दिवसात ३ टक्क्यांहून अधिक घसरला. अलिकडच्या काही महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. ट्रिगर? अमेरिकेकडून दुहेरी धक्का: औषधांसह भारतीय उत्पादनांवर २५% कर आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक औषध उत्पादकांना किंमती कमी करण्याची आणि भविष्यातील औषधांच्या लाँचच्या किमती मर्यादित करण्याची मागणी केली होती.
Comments
Add Comment

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

Breaking News! डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर ५०% आयात शुल्क लादण्याचे आदेश

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लावण्याच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Gold Silver Price Today: सोन्यात सहाव्यांदा धमाकेदार वाढ व चांदीत सलग दुसऱ्यांदा वाढ कायम ! 'हे' आहे विश्लेषण

मोहित सोमण: आज सोन्याच्या दरात सहाव्यांदा धमाकेदार वाढ व चांदीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली. काल सोन्यात मोठ्या

Paytm: रक्षाबंधनाकरिता पेटीएमचे गिफ्टिंग पर्याय

रक्षाबंधनाकरिता पेटीएमचे गिफ्टिंग पर्याय मुंबई: विश्वास आणि प्रेमाच्या नात्याचा सन्मान करत पारंपरिक

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: आजही घसरगुंडीच ! टेरिफशिवाय फार्मा, रिअल्टी शेअर्सनेही बाजाराला लोळवले !

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेर घसरगुंडीनेच झाली आहे. अखेरचे सत्र रेपो दर निकालांच्या