मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले आंदोलन स्थगित केल्याची माहिती ...
याआधी दादरच्या कबुतरखाना परिसरात बुधवारी ६ ऑगस्ट रोजी जैन समाजाने आक्रमक आंदोलन केले. मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो बंद केला होता. आंदोलकांनी ताडपत्री हटवून कबुतखान्यात धान्य टाकले आणि घोषणाबाजी केली. कबुतरखाना सुरू ठेवण्याची मागणी केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात यू टर्न घेतला आहे. चार दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करणाऱ्या मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात महाराष्ट्र शासनाने थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी केली आहे.
कबुतरखाने मानवी वस्तीपासून दूर असावेत अशी मनसेची आधीची अधिकृत भूमिका होती. पण मुंबईतले जैन समाजाचे आंदोलन बघून मनसेने यू टर्न घेतला आहे. मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात महाराष्ट्र शासनाने थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी करायला सुरुवात केली आहे.