खारेपाट भागाला आजही गढूळ पाणीपुरवठा

साथीचे आजार पसरण्याची भीती


पेण : पेण तालुक्याच्या खारेपाटातील अनेक गावांना, वाड्यांना नेहमीच पाणीटंचाईचा व गढूळ पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न सुटण्यासाठी विविध प्रकारची स्थानिकांनी आंदोलने केली. तरीही खासदारांसह स्थानिक आमदारांना पाझर फुटला नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे स्थानिक ग्रामस्थ संताप व्यक्त करीत असून, पाणीप्रश्न कधी सुटून स्वच्छ आणि नियमीत पिण्याचे पाणी मिळणार या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.


शहापाडा धरणाची साठवण क्षमता ८३५ दश लक्ष मीटर असून, ४० उंच, ७२० फूट लांबीचे हे शहापाडा धरण आहे, तर ३६० फुटाचा सांडवा या आराखड्यात धरणाची साठवण क्षमता ८३५ दशलक्ष मीटर एवढी आहे.


मात्र गेली कित्येक वर्षांपासून धरणातील साचलेला गाळ न उपसल्याने धरण संपूर्ण गाळाने भरलेले आहे. पाण्याची साठवण क्षमता गाळामुळे कमी झालेली असल्याने लवकरच हे धरण पाण्याने भरले जाते, तसेच शहापाडा धरणावर असलेले फिल्टरेशन प्लांट फक्त नावाला आहे. हा प्लांट कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या धरणातून स्थानिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही.


परिणामी स्थानिकांना गढूळ व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील पाणीप्रश्न सुटू न शकल्याने राजकीय दृष्टीकोनातून या प्रश्नावर श्रेयाच्या लढाईत स्थानिक नागरिक व खारेपाट नागरिक पिण्याच्या पाण्याची वाट पाहात आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून वाशी विभागातील ग्रामस्थांना सध्या लालसर व दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे वाशी विभागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


जोपर्यंत सदर जलवाहिनीचे लिकेज सापडून त्याचे काम होत नाही, तोवर ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सांडपाणी मिश्रीत पाणी संबंधीत जिपच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर पाणी पिण्यासाठी भेट देण्याचे लक्षवेधी आंदोलन खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून केले जाईल असा इशारा स्थानिकांनी
दिला आहे.

Comments
Add Comment

उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन वनराई बंधारे करणार

पंचायत समिती २१ बंधारे, कृषी कार्यालय बांधणार ५० शैलेश पालकर पोलादपूर : उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग

शैक्षणिक सहली, लग्नसमारंभांसाठी 'लालपरी' सुसाट

खासगी वाहनांपेक्षा एसटीतून होणार पारदर्शक आणि सुरक्षित प्रवास स्वप्नील पाटील पेण : नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या

जिल्ह्यात ४५४ बालके कुपोषित

उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा अभाव अलिबाग : महिला व बालविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणात रायगड

चौलच्या पर्वतवासी श्री दत्तात्रेय देवस्थानच्या यात्रेला सुरुवात

सोमवारी, ८ डिसेंबरला पाच दिवसाच्या यात्रेचा होणार समारोप अलिबाग : चौलच्या पर्वतवासी श्रीदत्तात्रेय

औद्योगिक वसाहतींतील अंतर्गत रस्त्यांची चाळण

औद्योगिक वसाहतींतील अंतर्गत रस्त्यांची चाळण महाड  : रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत सर्वच