Eknath Shinde : शिंदेंची दौड पुन्हा दिल्लीत! शाह-मोदी भेटीत शिवसेनेच्या नाराजीचा हिशेब?

  32

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल झाले असून, आज (मंगळवार) त्यांची दिल्लीतील महत्त्वपूर्ण नेत्यांसोबत महत्त्वाची भेट होणार आहे. दुपारी एक वाजता ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून, त्यानंतर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत. गेल्या काही दिवसांत शिंदेंचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे. सतत दिल्लीत येत असलेल्या शिंदेंनी एनडीएतील इतर बड्या नेत्यांशीही चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठकींची मालिकाही महत्त्वाची मानली जात आहे. या दौऱ्याला आणखी एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे भाजप नेते परिणय फुके यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेली शिवसेनेतील नाराजी. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही भेट केवळ सौजन्यपूर्ण नसून, पक्षातील असंतोष निवळवण्याच्या दृष्टीनेही अत्यंत निर्णायक ठरणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.



आज (बुधवार) दुपारी त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजता शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी भेट घेणार असून, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही स्वतंत्र बैठक होणार आहे. शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलं आहे. शिवसेना ही सध्या एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यामुळे आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटी होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बैठकीत केवळ राष्ट्रपती निवडणुकीचाच नव्हे, तर महाराष्ट्रातील सत्तास्थिती, शिवसेनेतील संभाव्य फेरबदल आणि भाजपसोबतच्या आगामी राजकीय धोरणावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. आजच्या या बैठका कोणते राजकीय संकेत देतात, शिंदेंच्या पक्षात काही बदल घडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



आठवडाभरात दुसरा दौरा


विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातही त्यांनी अचानक दिल्लीला भेट दिली होती. त्या वेळी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा होती. काल (मंगळवारी) रात्री आठ वाजता शिंदे दिल्लीकडे रवाना झाले आणि रात्री १० वाजता ते राजधानीत दाखल झाले. आज (बुधवार) दुपारी ते पुन्हा मुंबईत परतणार आहेत. या तातडीच्या दौऱ्यात एकनाथ शिंदे दिल्लीतील काही खासदारांसोबत बैठक घेणार असून, इतर एनडीए नेत्यांचीही त्यांनी भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या दौऱ्यामागे कोणते राजकीय संकेत दडले आहेत, हे स्पष्ट होण्याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींना सशर्त जामीन

चाईबासा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात

Uttarkashi : उत्तरकाशीत पूर आपत्तीची झळ अधिक तीव्र; पुराच्या तडाख्यात ६० बेपत्ता, मदतकार्यासाठी शर्यत सुरू

उत्तरकाशी : मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीत एक धक्कादायक घटना घडली. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Amit Shah: अमित शहांनी लालकृष्ण अडवाणींचा विक्रम मोडला! भूषविले सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सर्वाधिक काळ देशाचे

DRDO गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला हेरगिरी प्रकरणात अटक

नवी दिल्ली: ज्योती मल्होत्रानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणानी आणखी एका हेराला अटक केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर