बदलापूरकरांवर पाणीकपातीचे संकट

बदलापूर : दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून वेळेअगोदर दाखल झाल्याने पाणीटंचाईचा सामना बदलापूरकरांना करावा लागणार नाही, असे वाटले होते. मात्र यावर्षी तर ऐन पावसाळ्यात ‘पाण्याचीही आठवडा सुट्टी’ होणार आहे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पत्रक काढून जाहीर केले आहे.


बदलापूर शहरात महावितरणाचा वेळीअवेळी होणाऱ्या विजेच्या लपंडावाचा फटका शहरातील पाणी व्यवस्थेलाही बसला आहे. बदलापूर आणि अंबरनाथ पाणीपुरवठा योजना १०० वर्षे जुनी असून अजूनही ती कार्यरत आहे. त्यातच शहरात महानगर गॅस, एमआयडीसी, सिग्नल यंत्रणा, सीसीटीव्ही, महावितरणचे आणि इतर कामांसाठी रस्ता खोदताना पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन कधी कधी फुटत असतात, त्यामुळे कुठे तरी पाणी गळती होतच असते. तसेच गेल्या वर्षभरात १००० नवीन पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहेत.


तसेच अजून ५०० नवीन कनेक्शन प्रस्तावित आहेत. त्यासाठी जवळजवळ २.५ द.ल.लि. पाणी अतिरिक्त लागत आहे. तसेच नवीन योजना अजून सुरू झालेली नाही. यावर्षी मे महिन्यापासून अवकाळी पाऊस पडल्याने बडोदा एक्सप्रेस मार्गाची माती पहिल्याच पावसात पाइपमध्ये जाऊन कार्यक्षमता कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रोज २०% पर्यंत पाणीपुरवठा कमी होत असल्याने टाक्यांची क्षमता ठरलेल्या वेळेत पूर्ण होत नाही. परिणामी, वेळेच्या नियोजनामुळे कमी दाबात पाणी सोडण्यात येते. पावसामुळे पाण्याच्या गढूळतेचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे दिवसातून किमान ३ ते ४ वेळा ट्रिपिंग होत असल्याने पंपिंग बंद होऊन याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.


पाटबंधारे विभागाकडून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना १४० एमएलडी इतका पाण्याचा कोटा २०२७ पर्यंत आहे. बडोदा मार्गाची माती पाइपमध्ये गेल्याने प्रत्यक्षात १२० एमएलडी पाणी वापरात येते.


म्हणजे एका शहराला ६० एमएलडी पाणी वापरता येते, असे जरी गृहीत धरले तरी, विविध कामांमुळे रस्ते खोदताना किवा इतर काही कारणामुळे पाइपलाइन कुठे ना कुठे फुटत असल्याने बदलापूर शहराला प्रत्यक्ष ५० एमएलडी पाणी सद्यस्थितीत मिळत आहे. अतिरिक्त २.५ एमएलडी पाणी देण्यास यंत्रणेवर ताण येत आहे. हे टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस त्या त्या भागात पाणीकपात तर उरलेल्या ८०% भागाला योग्य पाणीपुरवठा करता येईल.


हे नियोजन अंबरनाथमध्ये सुरू असून बदलापूर शहरासाठी देखील असेच नियोजन केल्यास कमीत कमी ८०% भागांना आठवड्यातून किमान ६ दिवस तरी सुरळीत पाणीपुरवठा करता येईल. सध्या चाचणी स्वरूपात साधारणतः २ आठवडे पाणीपुरवठा कपात करण्याचे प्रस्तावित असून गरज पडल्यास हा कालावधी वाढू शकतो असे मजीप्रा बदलापूरचे उपविभागीय अधिकारी सुरेश खाद्री यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Thane Crime : त्याने तिला लॉजवर नेलं... अन् घडल भयंकर; 4 वर्षाच्या प्रेमाला एका क्षणात संपवलं

ठाणे : ठाण्यातील एका लॉजमध्ये तरुणीची हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुकवरून ओळख झालेल्या

Kalyan Murder Case : दृश्यम फेल! घरमालकाला व्हॉइस मेल आला अन् भांडं फुटलं, बॉयफ्रेडचा मृतदेह आढळला गोणीत

कल्याणमधील हत्याकांड प्रकरणात वेगळेच वळण; फिंगरप्रिंट्स पुसले, घरमालकाला मेसेज पाठवला अन्... मुंबई :  कल्याणमधील

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकलमधील धक्कादायक घटना; साडी खांबाला अडकता-अडकता राहिली, मोठा अनर्थ टळला

मुंब्रा : मुंबई लोकल (Mumbai Local) ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असली तरी गर्दीमुळे (Crowd) दररोज जीव धोक्यात घालून प्रवास

Kalyan Crime : प्रियकराची हत्या करून मृतदेह पोत्यात भरला आणि घरमालकाला पाठवली 'ती' धक्कादायक व्हॉईस नोट; कल्याण हादरलं!

कल्याण : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या कल्याणमध्ये (Kalyan) एका धक्कादायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या

Doctors Strike : डॉक्टरांचा राज्यव्यापी संप अखेर मागे! रुग्णांना मोठा दिलासा; मात्र ९ ऑगस्टपासून आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा

ठाणे : डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने पुकारलेला राज्यव्यापी संप

Ambernath News : अंबरनाथमध्ये होर्डिंग लावताना विजेचा धक्का; 24 वर्षीय कामगाराचा मृत्यू

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीत होर्डिंग उभारण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात 24 वर्षीय कामगाराचा