आरबीआयकडून पुन्हा आश्चर्याचा धक्का रेपो दर ५.५०% कायम राहणार ! गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर !

  37

मोहित सोमण: अखेर ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला आहे. आरबीआयचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांनी यावेळी रेपो दर 'जैसे थे' ठेवला रेपो दरात कुठलाही बदल केला नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यावेळी आरबीआयने 'न्यूट्रल' स्टांन्स जाहीर करत आपला पतधोरण समितीचा निकाल घोषित केला. बिनविरोध हा निर्णय पतधोरण समितीने घेतला. ट्रम्प यांच्या टेरिफ धमकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे रेपो दर ५.५०% वर पुढील दोन महिने कायम राहणार आहे. माजी गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या काळात सहा वेळा रेपो दरात कपात केल्यानंतर प्रथमच त्यांनी २५ बेसिस पूर्णांकाची कपात केली होती. त्यानंतर एकूणच सलग तीनदा कपात झाल्याने १०० बेसिस पूर्णांकाची कपात आज अखेर थांबली. जूनमध्ये मागील निर्णयावेळेस आर बीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले होते की, रेपो दरांमध्ये जलद गतीने कपात केल्याने, समितीचे मत आहे की विकासाला पाठिंबा देण्यासाठी आता खूपच कमी धोरणात्मक जागा उरली आहे.

भारताच्या मध्यवर्ती बँकेने जूनच्या धोरणादरम्यान ती पुन्हा अद्यतनित (Updated) करून आता 'तटस्थ' (Neutral Stance) म्हणून आपली भूमिका कायम ठेवली आहे. एप्रिलच्या धोरणादरम्यान मध्यवर्ती बँकेने भूमिका 'समाधानकारक' मध्ये बदलली होती. 'तट स्थ' म्हणून भूमिका ठेवण्याचा निर्णय देखील एकमताने व बहुमताने घेण्यात आला आहे. म्हणूनच त्यामुळे जूनमधील अकोमोडेटिव (Accomodative) वरुन बदलत या ऑगस्ट बैठकीत 'तटस्थ ' (Neutral) भूमिका बदलण्यात आली. आपल्या भाषणात त्यांनी ग्रा मीण भागातील उपभोग (Consumption) मध्ये मोठी वाढ झाल्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अधोरेखित केले आहे. तर सेवा क्षेत्रात स्थिरता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या भाषणातील ठळक मुद्दे -

१) आरबीआयच्या सीपीआय इन्फ्लेशन (ग्राहक किंमत निर्देशांक Consumer Price Index) यामध्ये संपूर्ण वर्षासाठी ३.७% वरून यापुढील काळात ३.१% भाकीत त्यांनी केले. याशिवाय आर्थिक वर्ष २०२६ मधील दुसऱ्या तिमाही (Q2F Y26) मध्ये ३.४% वरून कपात करत २.१%, तिसऱ्या तिमाहीत (Q3FY26) ३.९% कपात करत वरून ३.१%, चौथ्या तिमाहीत (Q4FY26) ४.४% वर कायम ठेवण्यात आले आहे.

२) सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product GDP) मध्ये ग्रोथ ६.५% कायम राहिल असे गव्हर्नर आपल्या भाषणात म्हणाले. पहिल्या तिमाहीत ६.५%, दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) मध्ये ६.७%, तिसऱ्या तिमाहीत (Q3FY 26) ६.६%, चौथ्या तिमा हीत (Q4FY26) ६.३, आर्थिक वर्ष २०२७ मध्ये (Q1FY27) मध्ये ६.६% वर कायम राहिल असं गव्हर्नर म्हणाले. 

३) गव्हर्नर मल्होत्रा यांनी पुनरुच्चार केला की 'तटस्थ' भूमिकेकडे होणारे बदल हे येणाऱ्या डेटाच्या आधारे दोन्ही दिशेने कार्य करण्याची मध्यवर्ती बँकेची लवचिकता (Flexibility) दर्शवते. त्यांनी नमूद केले की देशांतर्गत अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात आरबीआयच्या मूल्यांकनाचा मागोवा घेत असताना, मे आणि जूनमध्ये काही उच्च-वारंवारता निर्देशकांनी मिश्र ट्रेंड दर्शविले आहेत. अल्पकालीन परिवर्तनशीलता (Transform) असूनही, मल्होत्रा यांनी भारताच्या आर्थिक मार्गावर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले,' मध्यम का लावधीत, भारतीय अर्थव्यवस्थेकडे बदलत्या जागतिक व्यवस्थेत उज्ज्वल संभावना आहेत, तिच्या अंतर्निहित (Revised) ताकद, मजबूत मूलभूत तत्त्वे (Fundamental Ethics) आणि आरामदा यी बफरवर आधारित हे असू शकेल.'

४) आरबीआयला आता आर्थिक वर्ष २६ मध्ये सरासरी ३.१% महागाई राहण्याची अपेक्षा आहे . जी आधीच्या अंदाजित ३.७% पेक्षा कमी असू शकते. तथापि, आर्थिक वर्ष २७ च्या पहिल्या तिमाहीत सीपीआय ४.९% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, जो मध्यवर्ती बँ केच्या ४% लक्ष्यापेक्षा (Target Basket) जास्त आहे असे बँकेने सुतोवाच केले.

५) तिमाहीनुसार महागाईचा अंदाज दुसऱ्या तिमाहीत २.१%, तिसऱ्या तिमाहीत ३.१% आणि चौथ्या तिमाहीत ४.४% आहे. एमपीसीने असे नमूद केले आहे की येत्या काही महिन्यांत अन्नधान्याच्या किमती, विशेषतः भाज्यांच्या किमती अस्थिर (Volatile) राहू शक तात. भू-राजकीय तणाव कमी झाला असला तरी, नवीन दर आणि आयात-संबंधित दबाव भविष्यातील किमती स्थिरतेवर परिणाम करू शकतात असे मल्होत्रा म्हणाले आहेत. 

६) जागतिक वातावरण आव्हानात्मक आहे अलिकडच्या काही महिन्यांत वित्तीय बाजारातील अस्थिरता आणि भू-राजकीय अनिश्चितता त्यांच्या शिखरावरून काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी, व्यापार वाटाघाटींमधील आव्हाने अजून ही कायम आहेत. जागतिक विकासदर, जरी आयएमएफने सुधारित केला असला तरी, तो अजूनही मंदावलेला आहे. चलनवाढ कमी होण्याची गती मंदावत आहे, काही प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये महागाईत वाढ देखील दिसून येत आहे, असे आ रबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले आहेत.

७) गेल्या तिमाहीपेक्षा महागाई वाढण्याचा अंदाज असूनही, चलनविषयक धोरणांचे प्रसारण सुरूच आहे. जूनमध्ये सलग पाचव्या महिन्यात मुख्य ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) महागाई ४ टक्क्यांपेक्षा कमी राहिली तरीही हे घडले. ग्राह क किंमत निर्देशांक (सीपीआय) मधील वर्षानुवर्षे बदलांद्वारे मोजली जाणारी मुख्य चलनवाढ जानेवारी २०१९ नंतरची सर्वात कमी) मे महिन्यात २.८ टक्क्यांवरून जून २०२५ मध्ये २.१ टक्क्यांपर्यंत घसरली असे गव्हर्नर यांनी नमूद केले.

त्यामुळे नजीकच्या काळात शेअर बाजारात व अर्थव्यवस्थेत त्याचा काय परिणाम होईल ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विशेषतः फार्मा व बँकिंग वित्तीय शेअर्समध्ये आज मोठी हालचाल पाहण्यास मिळू शकते.
Comments
Add Comment

'प्रहार' Exclusive - रेपो दर स्थिर पण मायक्रो व मॅक्रो इकॉनॉमीत काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर विविध तज्ञांकडून एकाच क्लिकवर !

मोहित सोमण: आरबीआयने आज रेपो दर जैसे थे ठेवले आहेत. त्यामुळे आता व्याजदरात येत्या दोन महिन्यांत कपात होणार नाही

Uttarkashi : धरालीतील 'कल्प केदार' मंदिराची दुर्दैवी पुनरावृत्ती; ८० वर्षांपूर्वी सापडले, आज पुन्हा गडप

धरालीचे प्राचीन शिवमंदिर ढगफुटीच्या तडाख्यात उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात

Bajaj Auto Q1 Results: बजाज ऑटोचा तिमाही निकाल जाहीर निव्वळ नफ्यात १४% वाढ

प्रतिनिधी: बजाज ऑटोने आपला आज तिमाही निकाल जाहीर केला आहे. ऑटो क्षेत्रातील नामांकित कंपनी बजाज ऑटोच्या निव्वळ

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

Tata Motors: हॅरियर आणि सफारीचे ॲडव्‍हेंचर एक्‍स व्हेरिएंट लाँच

साहस, कार्यक्षमता आणि सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांचे परिपूर्ण पॅकेज मुंबई:टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या

राहुल गांधींना सशर्त जामीन

चाईबासा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात