अनिल अंबानी ईडीच्या चौकशीसाठी दिल्लीत दाखल चौकशीत आणखी काय खुलासे होणार?

  35

मोहित सोमण: १७००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी अनिल अंबानी दिल्लीत पोहोचले आहे. ईडी (अंमलबजावणी संचालनालय Enforcement Directorate ED) ने त्यांना चौकशीचे समन्स बजावले होते. त्यासाठी अनिल अंबानी व त्यांचे दोन उच्च पदस्थ अधिकारी सतीश सेठ, अमिताभ झुनझुनवाला दिल्लीत पोहोचले. सरकारी नियामक मंडळ ईडीकडून आज अंबानी यांची सखोल चौकशी होऊ शकते. १७००० कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर ईडी, सेबी, सीबीआय यांनी आरोप केले होते. काही दिवसांपूर्वीच अनिल अंबानी यांच्याविरोधात 'लूक आऊट' नोटीस नियामक मंडळाने बजावली होती. परवानगीशिवाय देश सोडण्यास अनिल अंबानी यांच्या विरोधात प्रतिबंध केले होते.

अनिल अंबानी यांच्यावर २०१७ ते २०१९ कालावधीत येस बँकेने दिलेले कर्जाची रक्कम इतर कारणांसाठी हेरफेर करत दुसऱ्या शेल कंपनीत वळवल्याचा आरोप ईडीने केला.यानंतर दहा दिवसांपूर्वीच अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ५० हून अधि क ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या होत्या. मात्र त्यानंतर कंपनीकडून या धाडीचा आपल्या कारभारावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच गुंतवणूकदार, भागभांडवल धारकांच्या हिताला कुठलाही धोका नसल्याचेही म्हटले होते.

जुलैमध्ये ईडीने राज्यसभेला माहिती दिली होती की त्यांनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड यांच्या संशयित कर्ज घोटाळ्यांबाबत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी केंद्री य अन्वेषण विभागाने (CBI) दाखल केलेल्या दोन एफआयआरवर (First Information Report FIR) आधारित आहे. ईडीच्या मते आरएचएफएल (RHFL)आणि आरसीएफएल (RCFL)  यांनी १२५२४ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते ज्यात बहुतेक कर्जे दिली गेली होती. तसेच येस बँकेच्या काही अधिकारी वर्गाला 'फायदा' पोहोचवून हे कर्ज मंजूर केले होते असे आरोपही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर आहेत.

येस बँकेच्या प्रकरणाव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून कर्ज घेतले होते त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि प्रमोटर संचालक अनिल डी. अंबानी यांना 'फसवणूक' (Fraud) म्हणून वर्गीकृत केले आहे आणि सीबीआय कडे तक्रार दाखल केली होती. मात्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर अनिल अंबानी यांच्या खात्यावरील 'फसवणूक ' हा शब्द वगळला होता. अनिल अंबानी यांच्या कंपनीचे म्हणणे होते की त्यांना पुरेसा वेळ सुनावणीस देण्यात आला नव्हता. याशिवाय दिनांक १ जुलै २०२५ रोजी अनुपालनाचा (Compliance) भाग म्हणून, आरकॉमच्या (Reliance Communications) रिझोल्यूशन प्रोफेशनलने बँकेच्या फसवणुकीच्या वर्गीकरणाबाबत मुंबई शेअर बाजाराला माहिती दिली होती. 'आरकॉममध्ये एसबीआयच्या क्रेडिट एक्सपो जरमध्ये २६ ऑगस्ट २०१६ पासून जमा झालेले व्याज आणि खर्चासह २२२७.६४ कोटी रुपयांची निधी-आधारित मुद्दल थकबाकी आणि ७८६.५२ कोटी रुपयांची नॉन-फंड-आधारित बँक गॅरंटी समाविष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

आरकॉम दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता, २०१६ अंतर्गत कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेतून जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते. रिझोल्यूशन प्लॅनला कर्जदारांच्या समितीने मान्यता दिली आणि ६ मार्च २०२० रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा न्याया धिकरण (एनसीएलटी NCLT), मुंबई येथे दाखल केले आणि एनसीएलटीच्या मंजुरीची प्रतीक्षा सध्या कंपनी करत आहे. त्यामुळे लवकरच ईडीकडून होत असलेल्या चौकशीतून अनेक गोष्टी निष्पन्न होऊ शकतात. तत्पूर्वी रिलायन्सकडून काय माहिती मिळते ते पा हणे महत्त्वाचे ठरेल.
Comments
Add Comment

Gold Silver Rate: पाचव्यांदा सोन्यात गगनचुंबी व पाच दिवसांनी चांदीत रॉकेट वाढ ! ही आहेत 'कारणे'

मोहित सोमण:  सोन्यात आज 'गगनचुंबी' वाढ झाली आहे. जागतिक व्यापार अस्थिरतेचा फटका चौथ्या दिवशीही सोन्यात कायम

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: ट्रम्प यांच्या धमकीमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांची बरबादी कायम 'हे' आहे आजचे सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण: आज अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रातील घसरण ट्रम्प यांच्या टेरिफ

वसईत डॉक्टरच्या ऑटोमॅटीक ईव्ही कारचा थरकाप उडवणारा अपघात

वसई : वसई येथील सन सिटी परिसरात एका डॉक्टरचा आणि त्याच्या पत्नीचा भयानक अपघात झाला. मिथिलेश मिश्रा असं या

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक