मोहित सोमण: पहाटेचे आश्वासक चित्र असूनही सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३१७ अंकाने व निफ्टी ५० ५३.८५ अंकाने घसरला आहे. ही घसरण प्रामुख्याने गुंतवणूकदारांचा सावधान दृष्टीकोन असल्याने असू शक ते याशिवाय प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेने दिलेल्या २५% टेरिफपेक्षा अधिक वाढण्याची धमकी दिल्याने गुंतवणूकदारात अस्वस्थताही कायम आहे. सकाळी ९.३० वाजता गिफ्ट निफ्टी (०.२८%) सह सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६.०६ अंकांने वाढ झाली आहे व बँ क निफ्टीत ४४.८० अंकांने घसरण झाली आहे. सुरूवातीच्या कलात सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.२१% व स्मॉलकॅपमध्ये ०.०८% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३९%,०.०४% घसरण झाली आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये पीएसयु बँक (०.२३%) इतर सर्व क्षेत्रीय समभागात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण हेल्थकेअर (०.५०%), तेल व गॅस (०.९३%), फार्मा (०.४८%), फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक (०.४४%), आयटी (०.५४%), रिअल्टी (०.४६%) समभागात झाली.
पहाटे गिफ्ट निफ्टीत वाढ झाली होती मात्र सत्र सुरू होताच घसरण सुरू झाली. जागतिक पातळीवर अमेरिकेच्या टेरिफ धोरणाचा फटका जागतिक बाजारपेठेत बसला होता. विशेषतः आशियाई बाजारातील निर्देशांकात तो सातत्याने जाणवत होता मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता बहुतांश अर्थतज्ज्ञांनी वर्तवल्याने आशियाई शेअर बाजारात काल समाधानकारक वाढ झाली होती. अर्थात काल युएस बाजारातील अपेक्षित रोजगार डेटा येऊ शकला नसला तरी अमेरिकेतील टेरिफ वाढीमु ळे युएस ट्रेझरीतील महसूल वाढल्याची बातमी आल्यामुळे काल युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.१७%), एस अँड पी ५०० (१.४७%), नासडाक (१.९५%) हे तेजीत बंद झाले.
काल डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्यास भारतावर अव्वाच्या सव्वा कर लावण्याची धमकी दिली होती. ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेनमध्ये चाललेल्या युद्धाला खतपाणी घालत आहे असा गंभीर आरोप ट्रम्प यांनी केला. भा रताचे उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या सचिवांनी राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य देण्याचे स्पष्ट करत अमेरिकेच्या दबावाला बळी पडण्यास नकार दिल्याने अमेरिकेच्या वैफल्यग्रस्त ट्रम्प प्रशासनाने तेलावर अतिरिक्त टेरिफची नवी धमकी दिली. परिणामी बाजारात मजबू त फंडामेंटल असूनही निर्देशांकातील अस्थिरता कायम आहे.या व्यतिरिक्त अपेक्षित तिमाही निकालांचा फटका काही ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही बसला होता. आता तो काल व परवा मिड व स्मॉल कॅप शेअरला बसल्याने एका ठराविक पातळीपेक्षा अधिक पातळी सेन्सेक्स निफ्टीला गाठता आलेली नाही. कालही विश्लेषकांनी म्हटल्याप्रमाणे निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील विशिष्ट कामगिरीचे परिणाम बाजारात अपेक्षित असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारही (FII) अमेरिकेतील फेड व्याजदरात कपातीवरील अनु मानासह आरबीआयच्या रेपो निर्णयाला ६ तारखेपर्यंत काय प्रतिसाद देतील त्यावर बाजाराचे पुढील ठोकताळे अवलंबून असतील.
सकाळी सत्र सुरू झाल्यावर आशियाई बाजारातील सुरुवातीच्या कलात हेंगसेंग (०.०३%) वगळता इतर सर्व बाजारात वाढ झाली आहे. ज्यामध्ये तैवान वेटेड (०.८७%), जकार्ता कंपोझिट (०.५१%), शांघाई कंपोझिट (०.५३%), सेट कंपोझिट (१.०१%), कोसपी (१.४०%), निकेयी २२५ (०.६३%) वाढ झाली.
सकाळच्या सत्रात शेअर्सपैकी सर्वाधिक वाढ गॉडफ्रे फिलिप्स (९.२७%), न्यू इंडिया ॲशुरन्स (७.८९%),इंडसइंड बँक (४.४२%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (३.९२%), नुवामा वेल्थ (३.०६%), जस्ट डायल (२.८२%),जी ई व्हर्नोव्हा (२.५६%), उषा मार्टिन (२.३६ %),सारडा एनर्जी (२.४५%), भेल (२.३१%), सिमेन्स (२.०४%), जे के सिमेंट (१.८६%), आरसीएफ (१.३३%),लेमन ट्री हॉटेल (१.२८%), गोदरेज अँग्रोवेट (१.०२%), मारूती सुझुकी (०.७८%), माझगाव डॉक (०.६८%) समभागात झाली.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण त्रिवेणी टर्बाइन (६.८३%), एमसीएक्स (३.६३%), नेटवेब टेक्नॉलॉजी (२.९१%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (२.०१%), एचपीसीएल (२.३४%), बीपीसीएल (१.३१%), बीएसई (१.१८%), एचडीएफसी बँक (१.०२%), अदानी एनर्जी (०.८ २%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.७६%), सिप्ला (०.६७%), लोढा डेव्हलपर (०.६४%), इन्फोऐज इंडिया (०.६३%), अदानी पॉवर (०.६३%), इटर्नल (०.४९%), एशियन पेटंस (०.४८%), आयसीआयसीआय बँक (०.४१%), श्रीराम फायनान्स (०.३४%), बँक ऑफ बडोदा (०.२२%), टीसीएस (०.११%) या समभागात झाली.
आजच्या बाजारातील सुरूवातीच्या कलांवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,' रशियन तेल खरेदी केल्याबद्दल मी भारतावर अमेरिकेकडून शुल्कात मोठी वाढ क रणार आहे. हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे ताजे ट्विट एक मोठा धोका आहे. जर ते त्यांच्या म्हणण्यानुसार वागले तर भारत-अमेरिका संबंध आणखी ताणले जातील आणि भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर पूर्वीच्या विचारापेक्षाही वाईट परिणाम होऊ शकतो. आर्थि क वर्ष २६ मध्ये भारताच्या जीडीपी वाढीवर आणि कॉर्पोरेट उत्पन्नावरही परिणाम होईल. अजूनही उच्च मूल्यांकनावर व्यापार करणाऱ्या बाजाराने अशा संभाव्यतेला दुर्लक्षित केलेले नाही. परिस्थिती कशी विकसित होते हे पाहणे बाकी आहे. भारताला लक्ष्य करणे अन्याय्य आणि अवास्तव आहे या तथ्यांसह भारताचा प्रतिसाद हा संदेश देतो की भारत अनावश्यक सवलती आणि तडजोड करणार नाही.याचा अर्थ, नजीकच्या काळात बाजार अज्ञात क्षेत्रात आहे. जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्पने भारतावर शुल्क आणखी वाढवले तर बाजार २४५०० पातळीचा निफ्टी आधार तोडून नकारात्मक प्रतिक्रिया देईल. गुंतवणूकदार घडामोडी घडण्याची वाट पाहू शकतात. काही पैसे स्थिर उत्पन्नात हलवण्याचा विचार देखील केला जाऊ शकतो.'
सकाळच्या सत्रातील निफ्टीतील कलावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले की,' निफ्टी जरी मागील दिवसाच्या उच्चांकाला तोडण्यात अपयशी ठरला असला तरी २४६७० पातळीच्या वर यशस्वी बंद झाला असला तरी, कालच्या मुख्य वळणामुळे आपल्याला चढउतार सुरू ठेवण्यास प्रोत्साहन मिळते. सुरुवातीला २४९०० आणि त्यानंतर २५२६१ पातळीवर आमचे लक्ष आहे. २४६७० पातळीच्या पुढे घसरण आपल्याला चढउतारांच्या अपेक्षा सोडून देण्यास भाग पाडू शकते, परंतु आज कोसळण्याची शक्यता कमी आहे.'