त्यामुळे तज्ञांच्या मते उद्या वित्तीय पतधोरण समितीच्या निर्णयावर याचा परिणाम होऊ शकतो. काल ४ ऑगस्टपासून उद्या ६ ऑगस्टपर्यंत ही बैठक पूर्ण होऊन उद्या सकाळी आरबीआय गव्हर्नर आपला व्याजदराबाबत निकाल जाहीर करतील. असे असताना ट्रम्प यांनी हल्लाबोल केल्याचा अतिरिक्त परिणाम भारतीय बाजारावर होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त ट्रम्प यांनी फार्मा उत्पा दनावरही प्रचंड टेरिफ लावण्याचे संकेत यावेळी दिलेत. ट्रम्प म्हणाले सध्या आहे फार्मा उत्पादनातील आयातीत त्याच दरात मात्र पुढील १ वर्षात १५०%, त्यापुढील वर्षात २५०% टेरिफ वाढ करणा र असल्याचे म्हटले. घरगुती उत्पादनाला खतपाणी घालत आयातीवर मोठा कर लागणार असल्याचे त्यांना म्हटले. त्यामुळे याचा प्रतिकूल परिणाम भारतीय फार्मा उत्पादनांवर होण्याची शक्यता आ हे.
एसबीआयने आपल्या अहवालात आरबीआय उद्या २५ बेसिस पूर्णांकाने रेपो दरात कपात करू शकते असे म्हटले होते. इतरही अनेक संस्थांनी व ब्रोकरेज कंपन्यानी व्याजदरात कपातीचे संकेत दिले आहेत. सध्या ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आरबीआय हे पाऊल उचलू शकते. तसे झाल्यास व्याजदर कपातीचा मोठा फायदा ग्राहकांना,कि रकोळ गुंतवणूकदारांना, तसेच मध्यमवर्गीयांना होऊ शकतो.दर कपात केल्यास अतिरिक्त तरलता (Liquidity) निर्माण होऊ शकते त्यामुळे ग्राहकांच्या उपभोग्य वस्तूंच्या किमती व्याजदरात क पात केल्याने नियंत्रित राहू शकतात. मागील जून महिन्यातील बैठकीत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ०.५०% कपात करुन आश्चर्याचा धक्का दिला होता ज्यामुळे रेपो दर ६% वरून ५.५० % वर आला होता.आता पुन्हा २५ बेसिसने कपात केल्यास आणखी व्याजदर ५.२० अथवा ५.२५% वर जाऊ शकतो ज्याचा फायदा किरकोळ ग्राहकांना होणार आहे. रेपो दर कपात झाल्यास गृह कर्ज देखील स्वस्त होऊ शकते. त्याचा अंतिम परिणाम लगेच होणार नसला तरी हळूहळू बँका आपल्या व्याजदरात कपात करतील. त्यामुळे उद्या होणारा व्याजदरात कपातीबाबत निर्णय बाजारा ला मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडू शकतो. विशेषतः भारतासह आशियाई बाजारातील निर्देशांकात ते चित्र सकाळच्या सत्रात स्पष्ट होऊ शकते.
यापूर्वी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भारत रशियाकडून कच्चे तेल मोठ्या प्रमाणात आयात करत असल्याने युक्रेन रशिया युद्धाला खतपाणी घालत आहे. भारत हा कच्च्या तेलाचा मोठा आयातदार असल्याने रशियाला भारत रसद पुरवतो असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. ट्रुथ सोशल या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करत इतर देशांच्या तुलनेत भारताने युएसवर अधिक टेरिफ आकार ला असल्याचे म्हटले. आजच्या मुलाखतीतही ट्रम्प यांनी भारत हा चांगला व्यापारी भागीदार नसल्याचा उल्लेख केला. भारत हा युएस मध्ये अधिक व्यापार करतो. त्या तुलनेत युएस भारतात कमी निर्यात करते त्यामुळे युएस घाट्यात आहे. त्यामुळे भारताने रशियाकडून तेल विकत घेण्याचे सुरू ठेवल्याने आम्ही २४ तासात नवा अतिरिक्त टेरिफ लावू असे ट्रम्प म्हणाले आहेत.
भारत हा रशियाचा सर्वात मोठ्या आयातदारपैकी एक आहे. उपलब्ध माहितीनुसार,भारत रशियाचे १.७५ दशलक्ष प्रति बॅरेल तेल रोज आयात करतो. पहिल्या सहा महिन्यांत या आकडेवारीनुसार भारतात तेलाची आयात झाली आहे. जवळपास दरवर्षी १ ते २% आयात रशियन तेलाची भारतात वाढ आहे असे असताना ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या ८५ अब्ज डॉलर्सपर्यंत असलेल्या आ यातीला त्याचा फटका बसू शकतो. दरम्यान भारताच्या अधिकारिक प्रतिनिधीने युएस व युरोपच्या दुतोंडी कारभारावर टीका करत म्हटले आहे,' भारताला याप्रकारे लक्ष करणे हे अनाकलनीय आ हे. भारतावर टीका करणारे देश स्वतः ही रशियाशी व्यापार करतात.' असे म्हटले त्यामुळे भारतही आपल्या कणखर भूमिकेत असल्याने आगामी रशिया अमेरिका यांच्यातील शीतयुद्धात भारतही निर्णायक भूमिका बजावू शकते.
रशियाने अमेरिकेचा खरपूस समाचार घेतला आहे ज्यात डोनाल्ड ट्रम्प प्रशासनावर वॉशिंग्टनचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ग्लोबल साउथमधील राष्ट्रांविरुद्ध 'नववसाहतवादी' धोरण अवलंबल्याचा आरोप रशियाने केला आणि म्हटले आहे की,' कोणत्याही प्रमाणात शुल्क आणि निर्बंध इतिहासाचा नैसर्गिक मार्ग बदलू शकत नाहीत. याविषयी बोलताना रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा म्हणाल्या की अमेरिका आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र मार्ग निवडणाऱ्या राष्ट्रांवर राजकीयदृष्ट्या प्रेरित आर्थिक दबाव टाकत आहे आणि खरोखर बहुपक्षीय आणि समान जागतिक व्यवस्था तयार करण्यासाठी या देशांसोबत सहकार्य वाढवण्याची मॉस्कोची तयारी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धमकीनंतर युएस बाजारात घसरण !
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील नव्या टेरिफ धमकीमुळे युएस शेअर बाजारातही त्याचा फटका बसला आहे. ज्यामध्ये डाऊ जोन्स (०.१०%), एस अँड पी ५०० (०.२८%), नासडाक (०.४२%) बा जारात घसरण झाली आहे. अमेरिकेतील रोजगाराच्या आकडेवारीत घसरण झाल्याने बाजारातील भावना अस्थिर होत्या ज्यात आणखी टेरिफवरील मुद्यांचा भर पडला. याशिवाय सेमीकंडक्टर उ त्पादनवरही टेरिफवाढ केल्याचे सुतोवाच केले होते ज्याचाही फटका युएस बाजारातील गुंतवणूकदारांना बसला.
त्यामुळे उद्याच्या शेअर बाजारातील इक्विटीची सुरूवात घसरणीने सुरू होण्याची शक्यता असली तरी गिफ्ट निफ्टीतील सकाळचे संकेत बाजाराची पुढील दिशा स्पष्ट करतील.