'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: ट्रम्प यांच्या धमकीमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांची बरबादी कायम 'हे' आहे आजचे सविस्तर विश्लेषण

  29

मोहित सोमण: आज अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रातील घसरण ट्रम्प यांच्या टेरिफ धमक्यांनंतर झाली असताना अखेरचे सत्रही घसरणीत फलफटले गेले. अखेरचे सत्र बंद होताना सेन्सेक्स ३०८.४७ अंकाने घसरत ८०७ १०.२५ पातळीवर स्थिरावला आहे. तर निफ्टी ७३.२० अंकाने घसरत २४६४९.५५ पातळीवर स्थिरावला. त्यामुळे आजही बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या कोट्यावधी रूपयांची बरबादी झाल्याची शक्यता आहे.अखेरच्या सत्रात सेन्सेक्स बँक निर्देशांकात १७४.३३ अंकाने व बँक निफ्टीत २५९.१० अंकाने घसरण झाली. त्यामुळे सेन्सेक्स बँक निर्देशांक ६१६२०.४६ व बँक निफ्टी निर्देशांक ५५३६०.२५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१४,०.२७% घसरण झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३९%,०.३१% घसरण झाली. कालची घसरण आजही कायम राहिल्याने बाजारातील सपोर्ट लेवलला धक्का बसलाय. या व्यतिरिक्त निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये मेटल (०.०९%),कंज्यूमर ड्यु रेबल्स (०.१२%), ऑटो (०.३७%) इतर क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. सर्वाधिक घसरण एफएमसीजी (०.७२%), हेल्थकेअर (०.४८%), मिडस्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (१.०२%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.६८%), फार्मा (०.८३%), मिडकॅप सिलेक्ट (०.७८%), बँक (०.४७%) समभागात झाली.

आजही सकाळच्या घसरणीचा पाढा संध्याकाळपर्यंत कायम राहिल्याने आजही गुंतवणूकदारांचे नुकसान अपेक्षित आहे. विशेषतः ब्लू चिप्स कंपनीबरोबरच मिड व स्मॉल कॅप समभागात झालेल्या घसरणीमुळे बाजारात सपोर्ट लेवल प्राप्त झाली नाही. याशिवाय स काळी सपाट पातळीवरील असलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) विशेष म्हणजे अखेरच्या सत्रात मात्र २.१३% घसरला असूनही आज शेअर बाजारातील इक्विटी बेंचमार्क नकारात्मक राहिला. ही झालेली घसरण जागतिक अस्थिरतेसह डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीमुळे झालेली असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. काल उशीरा ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोशल मिडिया अकाऊंटवरून भारतावर ताशेरे ओढले होते. त्यांनी पोस्टमध्ये भारतावर काही गंभीर आरोप केले ज्यामध्ये भारत हा रशियाकडून कच्चे तेल (Crude) खरेदी करत युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रक्तपाताला खतपाणी घातले आहे असा आरोप त्यांनी केला. याशिवाय त्यांनी भारताने युएस आयातीवरील अधिक कर लादला यांची पुनरावृत्ती प्रेससमोर त्यांनी केली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, भारताने रशियाकडून तेल वेळोवळी खरेदी करत रशियाला आर्थिक रसद पुरविल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. असे असले तरी भारताने आपण केवळ राष्ट्रहित प्रथम असल्याने केवळ देशाच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले आहे असे म्हटले होते. त्यामुळे भारत शरण येत ना ही म्हणून वैफल्यग्रस्त ट्रम्प प्रशासनाने आरोपांची राळ उडवून भारतावर २५% पेक्षा आणखी टेरिफ कर लावण्याची धमकी दिली.

एका प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, भारत या २५% व अतिरिक्त कर बोजाच्या नकारात्मक परिणामाला सकारात्मकतेत बदलण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत २०००० कोटींचे एक्सपोर्ट प्रमोशन मिशन सुरू करणार आहे. ज्यामध्ये भारतातील उद्योजकांना जा स्तीत जास्त निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले जाऊ शकते. असे असले तरी बाजारातील घसरणीला आणखी दोन प्रमुख कारणेही जबाबदार आहेत ती म्हणजे उद्या आरबीआयच्या वित्तीय पतधोरण समितीचा निकाल जाहीर होईल. उद्या आरबीआयचे गर्व्हनर संजय म ल्होत्रा स्वतः रेपो दराविषयी निर्णय जाहीर करणार असल्याने नक्की ते दर कपात करतील की स्थिर ठेवतील याविषयी आशंका असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. गेल्या काही दिवसाप्रमाणे आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Instit utional Investors FII) यांच्याकडून अधिक प्रमाणात रोख गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता असली तरी घरगुती गुंतवणूकदारांनी देखील अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने बाजारात घसरण झाल्याचा कयास आहे.

याशिवाय आज जाहीर झालेल्या तिमाही निकालानेही निराशा केल्याने तसेच आज महिन्याची अंतिम एक्सपायरी असल्याने मोठ्या प्रमाणात 'शॉर्ट कव्हरिंग 'अथवा 'सेल ऑफ ' झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे गुंतवणूकदारांनी तज्ञांच्या सांगण्याव रून बाजारात वेट अँड वॉचचे धोरणदेखील अंगिकारल्याने बाजारात घसरण आज अपेक्षित होती. याखेरीज आयटी, हेल्थकेअर, एफएमसीजी, फायनांशियल सर्व्हिसेस शेअर्समध्ये झालेली क्षेत्रीय विशेष निर्देशांकांची कामगिरी घसरणीस कारणीभूत ठरली.

जागतिक परिपेक्षात बघितल्यास टेरिफ वाढ झाल्यानंतरही ओपेक उत्पादनात वाढ करण्याच्या दिलेल्या आश्वासनामुळे कच्चे तेल स्थिर राहिल्याने तेलवाढीचा फटका बाजारात बसला नाही. अमेरिकेतील बाजारात टेरिफमुळे वाढवत अपेक्षित महसूल वाढीचे दावे केले जात असले तरी युएस बाजारातील नव्या अहवालानुसार अमेरिकेत आर्थिक मंदी येण्याची ५०% शक्यता आहे. अमेरिकेतील रोजगार (Non Farm) आकडेवारी कमजोर आल्यानंतर ट्रम्प यांनी ही आकडेवारी नाकारत युएस लेबर कमिशनच्या अध्यक्षांची ह कालपट्टी केली होती. केवळ ७२००० रोजगाराची वाढ झाल्याने अमेरिकेची जागतिक पातळीवर नाचक्की झाली. याशिवाय युएसमधील ग्राहक उपभोग खर्चात (Consumer Consumption Expenditure) अथवा पीएसई (Personal Consumption Expend iture PCE) निर्देशांकात घसरण झाल्यानेही अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळीत असल्याचे यातून स्पष्ट होते.

आकडेवारीनुसार, कच्च्या तेलाच्या निर्देशांकात आज घसरण झाली होती जी संध्याकाळपर्यंत कायम राहिली. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात १.१६% इतकी मोठी घसरण झाली असून Brent Future निर्देशांकातही १.०२% इतकी मोठी घसरण झाली आहे. आज ट्रम्प यांच्या टेरिफ धमकीनंतर दबावाची पातळी वाढल्याने भारतीय रूपयात घसरण झाली. अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण झाली. संध्याकाळपर्यंत रूपयांचा दर प्रति डॉलर संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत १९ पैशाने घस रला होता. आज सोन्याच्या निर्देशांकातही तुफान वाढ झाल्याने सोन्याची दरपातळी उंचावली आहे. रूपयांच्या अवमूल्यनासह जागतिक अस्थिरतेत सोन्यात गुंतवणूकीसाठी वाढलेल्या अतिरिक्त मागणीमुळे ही वाढ झाली. आजही डॉलर निर्देशांकात मोठी वाढ झा ल्याने सोन्याच्या किंमतीला भारतीय सराफा बाजारातआधार मिळू शकला नाही. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.५९% घसरण झाली.

आज बीएसईतील ४१९७ समभागातील १७४३ समभागात वाढ झाली असून २२९९ समभागात घसरण झाली. एनएसईतील ३०६५ समभागापैकी १२०० समभागात वाढ झाली असून १७८५ समभागात घसरण झाली. विशेष म्हणजे घसरण असूनही एनएसईतील ७९ शेअर अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत. आरबीआयच्या आगामी पतधोरण समिती निर्णयावर आश्वासकता असल्याने आशियाई बाजारात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ निकेयी २२५ (०.६२%), कोसपी (१.५७%), शांघाई कंपोझिट (०.९५%), तैवान वेटेड (१.१९%) बाजारात झाली. सुरूवातीच्या कलात युरोपियन व युएस बाजारातही वाढ झाली आहे.

आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ न्यूजेन सॉफ्टवेअर (१२.०९%), तानला प्लॅटफॉर्म (११.६२%), न्यू इंडिया ॲशुरन्स (५.८९%), सोलार इंडस्ट्रीज (३.८६%), विशाल मेगामार्ट (३.४९%), सिमेन्स (२.९२%), माझगाव डॉक (२.९२%), इंडसइंड बँक (१.८८%),को टक बँक (०.०३%), टाटा स्टील (०.०४%) समभागात झाली.

आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण त्रिवेणी (९.७४%), आयनॉक्स इंडिया (४.६८%), नेटवेब टेक्नॉलॉजी (४.०८%), बीएसई (४.०८%), स्विगी (३.४२%), इंडिजेन (३.२५%), पिरामल एंटरप्राईजेस (३.२३%), आयआयएफएल फायनान्स (२.७२%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (२.६२%), गोदरेज कंज्यूमर (२.४०%), जेल इंडिया (१.८३%), आयसीआयसीआय बँक (१.२८%), एचडीएफसी बँक (०.७२%), सन फार्मा (०.५८%) समभागात झाली.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ज्येष्ठ तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक मंदार भोजने म्हणाले की,'भारतीय शेअर बाजारांचा दिवस कमकुवत राहिला, निफ्टी २४,७०० च्या खाली घसरला बंद होताना, सेन्सेक्स ३०८.४७ अंकांनी किंवा ०.३८% ने घसरून ८०,७१०.२५ वर बंद झाला, तर निफ्टी ७३.२० अंकांनी किंवा ०.३०% ने घसरून २४,६४९.५५ वर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, ऑटो निर्देशांकाने चांगली कामगिरी केली, ०.४% वाढ झाली, तर बँकिंग, आयटी, तेल आणि वायू, एफएमसीजी आणि फार्मा यांसारखे इतर प्रमुख निर्देशांक सुमारे ०.५% च्या तोट्यासह बंद झाले. विस्तृत बाजारपेठा तुलनेने स्थिर होत्या, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी किरकोळ तोट्यासह समाप्त केले जे स्टॉक-विशिष्ट क्रियाकलाप (Activity) दर्शविते.

तांत्रिक आघाडीवर, निफ्टीने लवचिकता दाखवणे सुरू ठेवले आहे. त्याला त्याच्या १०० ईएमएच्या (Exponential Moving Average EMA) जवळ आधार मिळाला आणि आता तो सलग सात सत्रांपासून त्याच्या वर टिकून आहे, जे सूचित करते की संभाव्य तेजी ची उलटफेर खेळात आहे. पुढे जाऊन २५००० पातळीवर तात्काळ प्रतिकार दिसून येतो आणि २५२०० पातळी असे क्षेत्र जिथे व्यापारी अंशतः नफा बुकिंगचा विचार करू शकतात. नकारात्मक बाजूने २४४००–२४१८६ हा एक महत्त्वाचा आधार क्षेत्र आहे, जो २०० ईएमए (EMA) शी जुळतो, जो कोणत्याही घसरणीसाठी एक मजबूत आधार प्रदान करतो. बँक निफ्टी तुलनेने कमकुवत आहे आणि निफ्टीपेक्षा कमी कामगिरी करत आहे. तो अजूनही त्याच्या अलीकडील रेंज ब्रेकआउट झोनच्या खाली व्यापार करत आहे,जो ग तीचा अभाव दर्शवितो. जर निर्देशांक ५५,११५ पातळीच्या खाली राहिला तर तो ५४९०० पातळीकडे आणखी सरकू शकतो, जिथे १०० ईएमए (EMA) आहे. दुसरीकडे ५६००० एक महत्त्वपूर्ण प्रतिकार पातळी म्हणून काम करेल. याच्या वर एक निर्णायक बंद नवी न खरेदी रस निर्माण करू शकतो.

अस्थिरतेत किंचित घट झाली, कारण इंडिया VIX १.८४% ने ११.७१ वर घसरला, जो कमी भीती आणि सुधारित व्यापारी भावना दर्शवितो.ऑप्शन्स सेगमेंटमध्ये, २४८०० आणि २५००० स्ट्राइकवर सर्वोच्च कॉल ओपन इंटरेस्ट दिसून येतो - जे प्रमुख प्रतिकार पात ळी दर्शविते. दरम्यान सर्वात जास्त पुट ओपन इंटरेस्ट २४६०० स्ट्राइकवर आहे, जो तो एक महत्त्वाचा सपोर्ट झोन असल्याचे सूचित करतो. एकत्रित तांत्रिक आणि डेरिव्हेटिव्ह सेटअप सूचित करते की जोपर्यंत प्रमुख सपोर्ट लेव्हल टिकतात तोपर्यंत वरच्या दिशेने चालू राहण्याची शक्यता असते. व्यापाऱ्यांना सावधगिरीने आशावादी राहण्याचा, दर्जेदार नावे जमा करण्यासाठी घटांचा वापर करण्याचा आणि योग्य स्टॉप-लॉस धोरणांसह जोखीम व्यवस्थापित करण्याचा सल्ला दिला जातो.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' जागतिक पातळीवर सकारात्मक संकेत असूनही, देशांतर्गत बाजारपेठा नकारात्मक क्षेत्रातच राहिली. रशियन तेलाव रील भविष्यातील आयात निर्बंधांबद्दलच्या चिंतेमुळे तेल आणि वायूच्या शेअर्समध्ये घसरण झाली. अमेरिकेला सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक असलेल्या फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये कमकुवतपणा कायम राहिला. भारतीय रुपयाच्या घसरणीमुळेही भावनांव र परिणाम झाला. याउलट जुलैच्या तुलनेत ऑटो शेअर्समध्ये वाढ होत आहे. गुंतवणूकदार आता आगामी आरबीआय धोरण निर्णयाची वाट पाहत आहेत, जिथे बाजाराला नजीकच्या काळात दर कपातीची किरकोळ अपेक्षा आहे. सध्या, गुंतवणूकदारांची पसंती दे शांतर्गत वापरावर आधारित स्टॉक आणि बाह्य घटकांवर मर्यादित अस्थिरता असलेल्या क्षेत्रांना आहे.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,' भारतीय शेअर बाजार आज एका मर्यादित श्रेणीत व्यवहार करत होते, निफ्टी २४७२० पातळीवर फ्लॅट उघडत होता, जो दिवसाच्या अंतर्गत उ च्चांक २४,७३३ पातळीला स्पर्श करत होता आणि २४५९२ पातळीच्या नीचांकी पातळीवर घसरला. ऑटो आणि कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये सापेक्ष ताकद दिसून आली, तर बहुतेक इतर क्षेत्रे लाल रंगात संपली. विशेष म्हणजे, तेल आणि वायू, फार्मा, बांधकाम आणि कंझ्युमर गुड्समध्ये स्पष्ट कमकुवतपणा जाणवला. उद्याच्या चलनविषयक धोरण घोषणेपूर्वी, सावधगिरी बाळगली गेली आणि सत्राच्या दुसऱ्या सहामाहीत बँकिंग शेअर्सवर पुन्हा विक्रीचा दबाव आला. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, बाजारातील रुंदी मंदीच्या दिशेने झु कली, कारण अँडव्हान्स-डिकलाइन गुणोत्तर (Ratio) नकारात्मक राहिले. नुवामा, युनो मिंडा, पेटीएम, एंजेल वन आणि एक्साइड इंडस्ट्रीज सारख्या नावांमध्ये ओपन इंटरेस्ट वाढला,ज्यामुळे या शेअर्समध्ये वाढलेली क्रियाकलाप आणि संभाव्य अस्थिरता दिसून येते.एकूणच सहभागी बाजूला राहिले, पुढील बाजार हालचाली चार्ट करण्यासाठी धोरण निकालाच्या संकेतांची वाट पाहत होते.'

आजच्या बाजारातील निफ्टीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,' निफ्टीने दिवसभर नकारात्मक बाजूने व्यवहार केला, तो ५० ईएमए (EMA) पातळीच्या खाली राहिला. दैनिक चार्टवर ही निर्देशांक ५० ईएमए (EMA) पातळीच्या खाली आरामात आहे. सध्याची श्रेणी २४४००-२४८५० आहे आणि अल्पावधीत, निर्देशांक या श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. या श्रेणीच्या पलीकडे जाण्याचा निर्णय घेतल्यासच बाजाराची पुढील कृती निश्चित होऊ शक ते.'

आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी संध्याकाळी उशिरा भारतावर जास्त कर लावण्याचे संकेत दिल्यानंतर बाजारांमध्ये घबराट पसरली आणि रुपया ८७.८० वर घसरला. याव्यतिरिक्त, रशियातील तेल आयात कमी करण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव आणेल या अपेक्षेमुळे आयात बिल वाढण्याची भीती निर्माण झाली, ज्यामुळे रुपया रात्रीतून ८८.०० रूपयांच्या खाली गेला. परराष्ट्र मंत्रालयाने क च्च्या तेलाच्या खरेदीबाबत भारताची भूमिका स्पष्ट केल्यानंतर काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. तथापि, व्यापार आणि उर्जेबाबत अमेरिका आणि भारत यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे रुपया अस्थिर आणि दबावाखाली राहण्याची शक्यता आहे. रुपया ८७.४०-८८.२५ रूपयांच्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे.'

आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'कॉमेक्स सोन्याचा भाव $३३७०-$३३७५ झोनजवळ प्रतिकार झाल्यामुळे सोन्याचा भाव ४०० रुपयांनी घसरून १००७८० पा तळीवर व्यवहार झाला, तर ८७.८० रूपयांच्या आसपास असलेल्या रुपयाने देशांतर्गत किमतींवर थोडासा दबाव आणला. बाजारातील सहभागी मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय आकड्यांवर लक्ष ठेवून आहेत, परंतु प्राथमिक लक्ष व्यापार शुल्क विकासावर आहे. अमेरिका त्यांच्या बाजूने शुल्क पुनर्संचयित करण्याचा विचार करत आहे. अल्पकालीन घसरण असूनही, व्यापार शुल्क अनिश्चितता आणि डॉलरच्या कमकुवतपणाच्या व्यापक परिणामात सोन्याच्या किमतीत वाढ होत राहते, ज्यामुळे एकूण ट्रेंडला आधार मि ळतो. सोन्याचा व्यापार ९९०००-१०१५०० रूपयांच्या अस्थिर श्रेणीत होण्याची अपेक्षा आहे.'

त्यामुळे आजही अस्थिरतेचे लोण कायम असल्याने उद्या रेपो दर निकालांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. उद्याच्या निकालावर बाजारात आतुरता असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील हालचालही युएस टेरिफ वाढीच्या मुद्यावर महत्वाची ठरू शकते.
Comments
Add Comment

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना

Amit Shah: अमित शहांनी लालकृष्ण अडवाणींचा विक्रम मोडला! भूषविले सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सर्वाधिक काळ देशाचे

Gold Silver Rate: पाचव्यांदा सोन्यात गगनचुंबी व पाच दिवसांनी चांदीत रॉकेट वाढ ! ही आहेत 'कारणे'

मोहित सोमण:  सोन्यात आज 'गगनचुंबी' वाढ झाली आहे. जागतिक व्यापार अस्थिरतेचा फटका चौथ्या दिवशीही सोन्यात कायम

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.