Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना


मुंबई: मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त शोज मिळवून देण्यासाठी सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार केला आहे. त्यासाठी शासन स्तरावर एक स्पेशल कमिटी स्थापन केली जाणार आहे. सरकारने याबाबत मल्टीप्लेक्स आणि थिएटर मालकांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी समिती नेमली आहे. या समितीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार येत्या दीड महिन्यात शासनाला अहवाल सादर करायचा आहे.


सध्या मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसल्यामुळे मोठा वाद सुरु आहे. अनेक हिंदी सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपट मल्टीप्लेक्समधून हटवण्यात आल्याच्या घटना घडत आहेत. यावर काही राजकीय पक्षांनी आपला आवाज उठवला होता. याच पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली आहे. ज्यात मराठी सिनेमांसाठी एक विशेष समिती स्थापन केली गेली आहे.  या समितीने दीड महिन्यात शासनाला अहवाल सादर करावा, मराठी सिनेमा जगला पाहिजे अशी राज्य शासनाची भुमिका असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्स मध्ये मिळणाऱ्या कमी स्क्रीन, तसेच त्यांना कोणतीही माहिती न देता तीन दिवसात सिनेमा थिएटरमधून उतरवणे, आठवड्याभराचे शुल्क घेऊन उर्वरित रक्कम परत न करणे, तसेच सेन्सॉर बोर्डाला वारंवार विनंत्या करूनही मराठी सिनेमांना सेन्सॉर संमती देण्याला विनंती करणे, मराठी सिनेमाच्या खेळांच्या वेळा ऐनवेळी बदलणे अथवा रद्द करणे यासारख्या अनेक प्रश्नांबाबत मराठी सिनेमांचे निर्माते, वितरक आणि विविध पक्षांच्या सिने कर्मचारी संघटनांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात बैठक झाली.


यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृहराज्यमंत्री योगेश कदम, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, नगरविकास प्रधान सचिव डी. गोविंदराज, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी आणि इतर विभागांचे अधिकारी, मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर, शिवसेना चित्रपट सेनेचे सुशांत शेलार, राष्ट्रवादी चित्रपट सेनेचे बाबासाहेब पाटील, व्हिडीओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी, वितरक समीर दीक्षित, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संदीप घुगे हेदेखील उपस्थित होते.


यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निर्माते, वितरक, मल्टीप्लेक्स मालक आणि इतर अधिकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले. तसेच मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण असून मराठी सिनेनिर्माता जगला तरच मराठी सिनेमाला चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या समितीचे अध्यक्ष गृह विभागाचे अपर मुख्य सचिव असून, प्रधान सचिव अपील आणि सुरक्षा, प्रधान सचिव नगरविकास २, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, परिवहन सचिव, मराठी सिनेमांचे निर्माते, वितरक, मल्टिप्लेक्स मालक,फिल्मसिटी अधिकारी, चित्रपट महामंडळाचे प्रतिनिधी, निर्माते महामंडळाचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल, येत्या दीड महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करणार असून, त्यानंतर याबाबत शासन अंतिम निर्णय करेल असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ

दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा