आदित्य इन्फोटेकचे ब्लॉकबस्टर पदार्पण थेट ५९% प्रिमियम दरात कंपनी Listed 'ही' आहे शेअरची किंमत

मोहित सोमण: ब्लॉकबस्टर सबस्क्रिप्शन मिळाल्यानंतर आज आदित्य इन्फोटेक लिमिटेड कंपनीचे ब्लॉकबस्टर लिस्टिंग झाले आहे.आज ५ ऑगस्टला कंपनी आयपीओनंतर सूचीबद्ध (Listed) होणार होती.आज अखेर ५०% प्रिमियम दरासह कंपनीने शेअर बा जारात आपले पदार्पण केले आहे. सकाळी सत्र सुरू झाल्यानंतर कंपनीचा शेअर १०१८ रूपयांवर सूचीबद्ध झाला होता जो मूळ प्राईज बँड असलेल्या ६७५ रूपयांपेक्षा ५०.८% अधिक होता. सकाळी १२.२० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत ५९.२१% अधि क प्रिमियम दरात विकला जात आहे ‌ ज्याची किंमत १०७४.६५ रूपये प्रति शेअर आहे.


आदित्य इन्फोटेक लिमिटेडने सबस्क्रिप्शन बाबतीतही चांगला प्रतिसाद मिळवला होता. कंपनीच्या आयपीओला १०६.२३ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले होते. उपलब्ध माहितीनुसार, या सबस्क्रिप्शनमधील पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Qualified Institutiona l Buyers QIB) १४०.५ वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Non Institutional Buyers NIB) ७५.९३ वेळा सबस्क्रिप्शन विकत घेतले. तर किरकोळ गुंतवणूकदारांनी ५३.८१ वेळा सबस्क्रिप्शन विकत घेतले. कंपनी प्रामुख्याने व्हिडिओ सिक्युरिटीज सो लूशन उत्पादन तसचे सर्वेलंस संबंधित तत्सम उत्पादने उपलब्ध करते.


कंपनीच्या माहितीनुसार १३००.५९ कोटींच्या आयपीओपैकी ३७५ कोटींची थकबाकी चुकवणार होती. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ७९११.८९ कोटी रूपये आहे.आयपीओपूर्वीच अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने ५८२.३० कोटीं चा निधी प्राप्त केला होता. हरी शंकर खेमका,आदित्य खेमका, अनन्मय खेमका, हरी खेमका हे कंपनीने प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी त्यांचे कंपनीतील ९२.५८% भागभांडवल घसरून आता ७६.७ % पोहोचले आहे. आदित्य इन्फोटेक, त्याच्या व्या पक मान्यताप्राप्त 'सीपी प्लस' ब्रँड अंतर्गत, एंटरप्राइझ आणि ग्राहक दोन्ही विभागांसाठी प्रगत व्हिडिओ सुरक्षा आणि पाळत ठेवणे उत्पादने आणि उपायांची विस्तृत श्रेणी ऑफर करते. त्याच्या ऑफरमध्ये एआय आणि आयओटी-सक्षम तंत्रज्ञान, एकात्मिक सुरक्षा प्रणाली आणि सुरक्षा-अ‍ॅज-अ-सर्व्हिस यांचा समावेश आहे, जे बँकिंग, आरोग्यसेवा, संरक्षण, किरकोळ विक्री आणि कायदा अंमलबजावणी यासारख्या क्षेत्रांना कंपनी सेवा देते.


हा व्यवसाय सीपी प्लस (CP Plus) उत्पादनांचे आणि व्यापार आणि दाहुआ उत्पादनांचे वितरण यामध्ये विभागलेला आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २९०० हून अधिक एसकेयूसह भारतात एकत्रितपणे कंपनीचा २५% वाटा बाजारपेठेत आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण