मोहित सोमण: ब्लॉकबस्टर सबस्क्रिप्शन मिळाल्यानंतर आज आदित्य इन्फोटेक लिमिटेड कंपनीचे ब्लॉकबस्टर लिस्टिंग झाले आहे.आज ५ ऑगस्टला कंपनी आयपीओनंतर सूचीबद्ध (Listed) होणार होती.आज अखेर ५०% प्रिमियम दरासह कंपनीने शेअर बा जारात आपले पदार्पण केले आहे. सकाळी सत्र सुरू झाल्यानंतर कंपनीचा शेअर १०१८ रूपयांवर सूचीबद्ध झाला होता जो मूळ प्राईज बँड असलेल्या ६७५ रूपयांपेक्षा ५०.८% अधिक होता. सकाळी १२.२० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत ५९.२१% अधि क प्रिमियम दरात विकला जात आहे ज्याची किंमत १०७४.६५ रूपये प्रति शेअर आहे.
आदित्य इन्फोटेक लिमिटेडने सबस्क्रिप्शन बाबतीतही चांगला प्रतिसाद मिळवला होता. कंपनीच्या आयपीओला १०६.२३ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले होते. उपलब्ध माहितीनुसार, या सबस्क्रिप्शनमधील पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Qualified Institutiona l Buyers QIB) १४०.५ वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Non Institutional Buyers NIB) ७५.९३ वेळा सबस्क्रिप्शन विकत घेतले. तर किरकोळ गुंतवणूकदारांनी ५३.८१ वेळा सबस्क्रिप्शन विकत घेतले. कंपनी प्रामुख्याने व्हिडिओ सिक्युरिटीज सो लूशन उत्पादन तसचे सर्वेलंस संबंधित तत्सम उत्पादने उपलब्ध करते.
कंपनीच्या माहितीनुसार १३००.५९ कोटींच्या आयपीओपैकी ३७५ कोटींची थकबाकी चुकवणार होती. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ७९११.८९ कोटी रूपये आहे.आयपीओपूर्वीच अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने ५८२.३० कोटीं चा निधी प्राप्त केला होता. हरी शंकर खेमका,आदित्य खेमका, अनन्मय खेमका, हरी खेमका हे कंपनीने प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी त्यांचे कंपनीतील ९२.५८% भागभांडवल घसरून आता ७६.७ % पोहोचले आहे. आदित्य इन्फोटेक, त्याच्या व्या पक मान्यताप्राप्त 'सीपी प्लस' ब्रँड अंतर्गत, एंटरप्राइझ आणि ग्राहक दोन्ही विभागांसाठी प्रगत व्हिडिओ सुरक्षा आणि पाळत ठेवणे उत्पादने आणि उपायांची विस्तृत श्रेणी ऑफर करते. त्याच्या ऑफरमध्ये एआय आणि आयओटी-सक्षम तंत्रज्ञान, एकात्मिक सुरक्षा प्रणाली आणि सुरक्षा-अॅज-अ-सर्व्हिस यांचा समावेश आहे, जे बँकिंग, आरोग्यसेवा, संरक्षण, किरकोळ विक्री आणि कायदा अंमलबजावणी यासारख्या क्षेत्रांना कंपनी सेवा देते.
हा व्यवसाय सीपी प्लस (CP Plus) उत्पादनांचे आणि व्यापार आणि दाहुआ उत्पादनांचे वितरण यामध्ये विभागलेला आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २९०० हून अधिक एसकेयूसह भारतात एकत्रितपणे कंपनीचा २५% वाटा बाजारपेठेत आहे.