राखी परंपरेची आधुनिक रंगत

  56

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर


श्रावणातील महत्त्वाचा आणि सगळ्यांचा आवडता सण रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे बंधनाचं नातं, प्रेमाचं प्रतीक आणि आनंदाचा उत्सव. प्रत्येक भावाबहिणीच्या नात्यात गोडवा आणणारा हा सण फॅशनसुद्धा सजवतो! या सणात प्रत्येक स्त्रीया नटायला आणि खास कपडे परिधान करायला उत्सुक असतात. साडीपासून ते इंडो-वेस्टर्नपर्यंत, पारंपरिक दागिन्यांपासून फ्यूजन लूकपर्यंत... आजच्या ट्रेंडमध्ये राखीसाठी खास फॅशनचे रंग खुलत आहेत.


हेवी दुपट्टा
एखादा गडद रंगाचा ड्रेस तुम्ही घेतलात आणि भरलेला दुपट्टा असेल, तर त्यावर तुमचा लूक छान दिसतो. रक्षाबंधनसाठी हा आऊटफिट परफेक्ट आहे.



इंडो वेस्टर्न
रक्षाबंधनात तुम्ही इंडो वेस्टर्न आऊटफिट स्टाईल करू शकता. यामध्ये काहीतरी वेगळा लुक दिसेल. इंडो वेस्टर्नमध्ये वेगवेगळे पॅटर्नही ट्राय करू शकाल.



कुर्ती प्लाझो
आपल्याला साधा सूट घालायचा असेल, तर पॅन्टसोबत कॉलर नेकलाइनसह डिझाइनची कुर्ती तुम्ही परिधान करू शकता. या कुर्तीवर तुम्ही मोठे कानातले परिधान केले, तर तुमचा लुक खूप उठून दिसेल.



सिबलिंग ट्विनिंग
हॅशटॅग राखी ट्विनिंग हे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. एखादे चांगल्या रंगाचं कापड घेऊन तुम्ही शिवू शकता. सेम टू सेम राखी आऊटफिट होईल आणि बहीण-भावाचे फोटोशूटसुद्धा छान होईल.



काँट्रास्ट ट्विनिंग
ट्विनिंग करणे म्हणजे एकाच रंगाचे कपडे घालणे हे गरजेचे नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडे परिधान करू शकतात. काँट्रास्ट फॅशन सध्या ट्रेंडमध्ये असून तुम्ही अशाप्रकारे देखील ट्विनिंग करू शकतात. जसे की भावाने काळ्या रंगाची कुर्ती परिधान केली असेल, तर बहिणीने सफेद रंगाचा सलवार कुर्ता किंवा साडी परिधान करावी. बहीण-भावांचा लूक सुंदर दिसेल.



फ्लोरल धोती सेट
तुम्ही अशा प्रकारचा किंवा यामध्ये अनेक पॅटर्न मिळतात त्यामध्ये ड्रेस घेऊ शकता. खूप छान लूक होईल, सध्या हे मार्केटमध्ये खूप ट्रेंडी आहे. मोठी कुर्ती आणि धोती पॅन्ट अतिशय सुंदर लूक दिसेल.



अनारकली
रफल्स, फ्रिल्स आणि भरपूर प्लेट्स असलेला अनारकली सेट सध्या अधिक ट्रेंडमध्ये आहे. यावर त्याच रंगाची प्लाझो अधिक शोभून दिसते.



पेस्टल शेड्स
पेस्टल रंगांचे कपडे तुमच्या त्वचेला एक वेगळी चमक देतात आणि ते दिसायला खूप सुंदर दिसतात. तुम्ही पेस्टल रंगाचे सूट किंवा साडी निवडू शकता.



Comments
Add Comment

हर तन तिरंगा

तिरंगी फॅशन ट्रेंड!  सौंदर्य तुझं : प्राची शिरकर स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव!

दिव्यांगांसाठी आदर्श ‘घरकुल’

वैशाली गायकवाड डोंबिवलीपासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या खोणी गावात, एका सेवाभावी प्रयत्नातून साकारले

गरोदरपणातला मधुमेह

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा काळ असतो.

अंतरंगयोग- ध्यान

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखामध्ये आपण धारणा या अंतरंगयोगातील पहिल्या पायरीविषयी समजून घेतलं.

जुळी गर्भधारणा आणि त्यातील आव्हाने

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणा ही स्त्रीच्या आयुष्यातील एक विशेष टप्पा असतो. यामध्ये जुळी बाळ होणे

आयुर्वेद, निसर्गोपचार आणि नवसर्जनशीलतेचा एक दीपस्तंभ

वैशाली गायकवाड आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा मूलभूत आधार आहे आणि हे आरोग्य नैसर्गिक पद्धतीने