राहुल गांधी म्हणाले होते की चिनी सैन्य सीमेवर भारतीय सैनिकांना मारत आहे. हे वक्तव्य भारतीय सैन्याची मानहानी करणारे आहे असा आक्षेप घेत राहुल गांधींविरुद्ध एक खटला दाखल झाला होता. याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले. जर तुम्ही खरे भारतीय असाल तर तुम्ही असे बोलू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले.
तुम्हाला जे बोलायचे होते ते संसदेत का बोलला नाही ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना विचारला. चीनने भारतीय भूभाग ताब्यात घेतला असे म्हणता मग त्याचे पुरावे का सादर करत नाही ? असाही प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना विचारला. जेव्हा सीमेवर अशांतता असते तेव्हा दोन्ही बाजूंचे नुकसान होत असते; असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींच्या वतीने अभिषेक मनु संघवी वकील म्हणून उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींचे वकील म्हणून अभिषेक मनु संघवी वकील यांना फटकारले.
न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने खटल्याला स्थगिती देऊन राहुल गांधींना दिलासा दिला. खंडपीठाने तोंडी टिप्पणीत राहुल गांधींना गंभीर आरोप करताना ठोस पुरावा सादर करण्याचा सल्ला दिला.