मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्र सपाट स्थितीत पोहोचले आहे. सेन्सेक्स २८ अंकाने घसरला असून व निफ्टी ५ अंकाने घसरला. पहाटेच गिफ्ट निफ्टीत ०.७०% वाढ झाली होती. सकाळी ९ वाजेपर्यंतही ०.०९% वाढला असल्याने आज बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत. विशेषतः आठवड्याच्या सुरुवातीलाच नवा 'ट्रिगर' सापडल्याने बाजारात वाढ अपेक्षित होती. तरीसुद्धा गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली असण्याची शक्यता असल्याने सुरूवातीच्या कलातील निर्देशांकात घसरण दिसत आहे. बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची वित्तीय पतधोरण समितीची (Monetary Policy Committee) बैठक ६ तारखेला संपन्न होत आहे. तेव्हा गव्हर्नर आपला रेपो दराबाबत निर्णय जाहीर करतील. तज्ञांच्या मते यावेळी अर्थव्यवस्थेत आणखी सुधार णा झाल्याने व्याजदरात आणखी २५ बेसिस पूर्णांकाची कपात अपेक्षित आहे. काही तज्ञांच्या मते रेपो दर 'जैसे थे ' देखील राहू शकतो. शुक्रवारी अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली असल्याने सकाळच्या सत्रात आशियाई बाजारातही थंड प्रतिसाद कायम राहिला आहे. विशेषतः वीआयएक्स ४.३४% उसळल्याने अखेरच्या टप्प्यातील निर्देशांकात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) कामगिरी महत्वाची भूमिका निभावेल.
युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ वाढीनंतर जगभरातील अस्थिरता आजही कायम आहे. याव्यतिरिक्त त्याचा नकारात्मक परिणाम युएस बाजारातही झाला. शुक्रवारी ट्रम्प यांनी युएस लेबर कमिशनच्या अध्यक्षांची उचलबांगडी केली. कारण कमिशनने केवळ नॉन फार्म (विना शेती) पेरोल आकडेवारीमध्ये केवळ ७३००० रोजगारांची वाढ झाली. तज्ञांच्या अपेक्षित आकड्यांपेक्षाही डेटामध्ये घसरण झाल्याने युएस बाजारात शुक्रवारीही त्याचा परिणाम झाला. किंबहुना जपान शेअर बाजारातही त्याचा फटका बसला.
सकाळच्या सत्रात आज सेन्सेक्स बँक निर्देशांकात २४.३६ व बँक निफ्टीत १७४ अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०५%,०.१६% घसरण झाली. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१३%,०.१०% वाढ झाली आहे. याखेरीज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये सकाळच्या सत्रात संमिश्र कौल आहे. सर्वाधिक वाढ मेटल (१.१७%), फायनांशियल सर्व्हिसेस (०.४२%), मेटल (१.१७%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (०.४६%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.७३%), आयटी (०.५६%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ सारडा एनर्जी (१४.७३%), युपीएल (६.५२%), एमसीएक्स (४.५५%), जेएसडब्लू एनर्जी (३.६१%), डेटा पँटर्न (३.१९%), सीसीएल प्रोडक्ट (३.०३%), नेटवेब टेक्नॉलॉजी (२.९८%), नेटवर्क १८ मिडिया (२.८४%), एलआयसी हाउसिंग फायनान्स (२.७४%), जिंदाल स्टील (२.६२%), जेएम फायनांशियल (२.१७%), टाटा स्टील (२.०१%), गार्डन रीच (२.०८%), बँक ऑफ बडोदा (२.०७%) समभागात झाली.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण अँडव्हान्स एनझाईम टेक्नॉलॉजी (८.५७%), बालाजी एमिन (५.३५%), रिलायन्स पॉवर (५.०१%), ग्रीन पॅनेल इंडस्ट्रीज (३.३६%), रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (४.९९%), डीसीबी बँक (३.१९%), वी गार्ड इंडस्ट्रीज (३.६८%), किर्लो स्कर ब्रदर्स (३.०५%), पीएनबी हाउसिंग फायनान्स (३.६१%), आर आर केबल्स (१.९३%), कजारिया सिरॅमिक्स (२.३२%), झेन टेक्नॉलॉजी (१.६०%),सम्मान कॅपिटल (१.९४%), अजंता फार्मा (१.८४%), अरविंद फॅशन (१.७८%), सनोफी इंडिया (२.०४%), न्यू इंडिया ॲशुरन्स (२.३३%), रेडिंगटन (३.६१%), सिमेन्स (१.५५%), अलकेम लॅबोरेटरी (०.८९%) समभागात झाली.
आजच्या सकाळच्या सत्रावर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज सकारात्मक दिशेने उघडण्याची अपेक्षा आहे, जसे की GIFT निफ्टीने सूचित केले आहे, जे निफ्टी ५० मध्ये सुमारे ७० अं कांची लक्षणीय वाढ दर्शवते. बाजारातील भावना सावधपणे आशावादी राहते, जरी वाढलेली अस्थिरता आणि मिश्र जागतिक संकेत गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम करत आहेत. तांत्रिक आघाडीवर, निफ्टीने त्याच्या १००-दिवसांच्या घातांकीय मूव्हिंग सरास री (EMA) चा भंग केला आहे, पुढील प्रमुख आधार २००-दिवसांच्या ईएमए(Exponential Moving Average EMA) जवळ २४१८० पातळीवर आहे, त्यानंतर २४००० पातळीची मानसिक पातळी कायम आहे. याउलट, जर निर्देशांक २४७५० पातळी पुन्हा मि ळवण्यात यशस्वी झाला, तर २५२५०–२५५०० झोनकडे अल्पकालीन पुनरागमन नाकारता येत नाही. तथापि, की ऑप्शन स्ट्राइकजवळ सतत अस्थिरता आणि दृश्यमान प्रतिकार (Visible Resistance )हे सतत ओव्हरहेड पुरवठा दबाव दर्शवितात.
बँक निफ्टीने कमकुवतपणा दाखवला, जवळजवळ ३४४ अंकांनी घसरण झाली आणि सलग पाचव्या आठवड्यात लाल रंगात बंद झाला जे सूचित करते की विक्रीचा दबाव कायम आहे. समर्थन पातळी ५५४०० त्यानंतर ५५१५० आणि ५५००० वर राहू शकतात.या पातळींपेक्षा जास्त टिकून राहिल्यास सौम्य पुनर्प्राप्तीसाठी जागा मिळू शकते, तर ५५७००-५५८०० झोनमध्ये तात्काळ प्रतिकार दिसून येतो. या बँडच्या वर ब्रेकआउटमुळे मानसिक ५६००० पातळीकडे वाढ होऊ शकते. संस्थात्मक दृष्टिकोनातून, परदेशी संस्थात्म क गुंतवणूकदारांनी (FIIs) १ ऑगस्ट रोजी सलग दहाव्या सत्रात त्यांची विक्रीची मालिका वाढवली, ३३६६ कोटी किमतीच्या इक्विटीज ऑफलोड केल्या. याउलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग २० व्या दिवशी त्यांची खरेदी सुरू ठेवली, त्या च दिवशी ३१८६ कोटी गुंतवले.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,' नजीकच्या काळात बाजार अनिश्चित स्थितीत आहे. पुढील फेरीच्या व्यापार वाटाघाटींनंतर अ मेरिका-भारत व्यापार कराराच्या बातम्यांबाबत स्पष्ट दिशा दिसून येईल. २०% किंवा त्यापेक्षा कमी दराने होणारा करार बाजाराच्या दृष्टिकोनातून सकारात्मक असेल. जर असे झाले नाही आणि २५% दर कायम राहिला तर बाजार खाली येण्याची शक्यता आहे का रण त्याचा भार ताच्या वाढीवर आणि कॉर्पोरेट उत्पन्नावर परिणाम होईल ज्यामुळे सध्याच्या वाढलेल्या मूल्यांकनांचे समर्थन करणे कठीण होईल. जागतिक बाजाराच्या दृष्टिकोनातून, जुलैमध्ये नोकऱ्यांमध्ये घट आणि मे आणि जूनमध्ये निर्माण झालेल्या नोकऱ्यांमध्ये घट दर्शविणाऱ्या नवीनतम रोजगार अहवालानंतर सप्टेंबरच्या FOMC बैठकीत फेडकडून दर कपात होण्याची शक्यता आहे असे संकेत आहेत. स्पष्टपणे, अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावत आहे आणि फेड सप्टेंबरमध्ये दर कपात करून प्रतिसाद देण्याची शक्यता आहे. टॅरिफचा महागाईचा परिणाम सुरू होत असताना, अमेरिकेसाठी स्थिर चलनवाढीची परिस्थिती नाकारता येत नाही. बाजार येणाऱ्या डेटा आणि विकसित होणाऱ्या दृष्टिकोनाला प्रतिसाद देईल.'
अनिश्चिततेचे आणि वाढत्या अस्थिरतेचे प्रचलित वातावरण पाहता, व्यापाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो की त्यांनी 'थांबा आणि पहा' (Wait and Watch) असा दृष्टिकोन ठेवावा, विशेषतः लेव्हरेज्ड पोझिशन्स (Leverage Positions) हाताळता ना.जोखीम प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी रॅली दरम्यान आंशिक नफा बुक करण्याची आणि कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस लागू करण्याची शिफारस केली जाते. निफ्टी वर टिकून राहिल्यासच नवीन दीर्घ पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. २४,७५० चा टप्पा ओ लांडला. एकूणच, बाजारातील भावना सावधपणे तेजीत असताना, प्रमुख तांत्रिक स्तरांचे आणि जागतिक घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे.'
त्यामुळे आज बाजारात वाढ जरी अपेक्षित असली तरी सुरूवातीचे कल मात्र किरकोळ घसरणीकडे अथवा सपाट (Flat) आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरू शकते.