भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनासाठी पोस्ट विभागदेखील लाडक्या बहिणींच्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे.


यावर्षदिखील पोस्टाने राखी पाठविण्यासाठी स्वतंत्र काउंटर सुरू केले आहेत. शहरातील ३४ पोस्ट कार्यालयात दररोज हजारो राख्यांच्या पाकिटांचे बुकिंग होत असून, त्या पोस्टातून राख्या विविध ठिकाणी पाठविल्या जातात. येत्या ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. पोस्टाने राखी स्पेशलचा लिफाफा सादर केला आहे. हा राखी लिफाफा वॉटरप्रूफ आहे. या लिफाफ्यातून पाठवलेली राखी न भिजता भावापर्यंत व्यवस्थित पोहोचवली जाणार आहे.


लिफाफा वॉटरप्रूफ असल्याने राखीचे पाकीट पावसातही सुरक्षित राहील. पार्सल पाठवल्यानंतर ते कुठे पोहोचले आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.


इंडियन पोस्टने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केली आहे की, लोकांना आपला लिफाफा कुठे पोहोचला आहे हे फक्त एका क्लिकवर कळू शकते. अवघ्या एका क्लिकवर पार्सलशी संबंधित सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.


स्पीड पोस्ट, रजिस्टर, सामान्यतः वजनानुसार ५ रुपयाचे तिकीट लावून राखी पाठवू शकतात. ग्राहकांना जशी गरज आहे त्याप्रमाणे राखी पाठवू शकतात. सर्व पोस्ट ऑफिसमध्ये बुकिंग करण्याची सुविधा आहे. रजिस्टरसाठी २२ रुपये, स्पीड पोस्ट पुण्यात १८ रुपये आणि पुण्याच्या बाहेर असेल तर ४१ रुपये आहे वजनाप्रमाणे दर बदलत राहतात. बाय एअर मेल सुविधा उपलब्ध आहे. स्पीड पोस्टने राखी पाठविली तर ट्रॅकिंगची सुविधा आहे. ( जनसंपर्क निरीक्षक, पिपरी) के. एस. पारखी,

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी