साखरपुडा परंपरागत पद्धतीने झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा अजित पवार, अजित पवारांचे दोन्ही मुलगे, राशपचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार तसेच पवार कुटुंबातील इतर सदस्य आणि आप्तेष्ट उपस्थित होते.
कोण आहेत युगेंद्र श्रीनिवास पवार ?
अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात पदार्पण झाले. युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आणि अजित पवार विजयी झाले होते. निवडणुकीत पराभव झाला तरी युगेंद्र पवार पक्ष कार्यातून राजकारणात सक्रीय आहेत. त्यांचा साखरपुडा रविवार ३ ऑगस्ट २०२५ रोजी प्रभादेवी येथील इंडिया बुल्स बिल्डिंग तनिष्का कुलकर्णी यांच्या घरीच आहे.