नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन
नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ येथील राजमाता जिजामाता तलावात उतरत आपले जीवन संपवले. नैराश्याचे कारण देत आत्महत्या करत असल्याचे कारण निष्पन्न झाले असून सोबत सुसाइड नोट सापडली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नेरळ राजबाग येथे राहणारे जनार्दन नारायण गायकवाड यांनी सुसाईड नोट लिहित नेरळ ग्रामपंचायत समोरील राजमाता जिजामाता तलावात उडी घेत आपले जीवन संपवले. त्यांच्यासोबत त्यांचे आधार कार्ड सापडले असून त्यावरून ते ८६ वर्षांचे असल्याचे सिद्ध होत आहे.
सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी मी राजबाग बिल्डींग नंबर १२ मध्ये राहत असून मी माझ्या आयुष्याला कंटाळून आत्महत्या करत असून कोणाला ही जबाबदार धरू नये असे लिहिले आहे. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून नेरळ पोलीस अधिक तपास करत आहेत.