इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९ पासून सुरू होणाऱ्या भाड्यांवर विमान प्रवासाची संधी उपलब्ध करून दिली आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मार्गांवर सवलतीच्या तिकीट दरांसह विविध साहाय्यक सेवांवरही विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. ही मर्यादित कालावधीतील ऑफर केवळ एकमार्गी प्रवासासाठी लागू असून देशांतर्गत मार्गांवरील भाडे ₹१,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय मार्गांवरील भाडे ₹४,३१९ पासून सुरू होणार आहे. तसेच इंडिगो स्ट्रेच (अतिरिक्त लेगरूम) सीटचे भाडे ₹९,९१९ पासून सुरू होणार आहे.


या सेलसाठी बुकिंग विंडो ३ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२:०१ पासून सुरू झाली असून ती ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार आहे. यासाठी इंडिगोची अधिकृत वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप तसेच एआय सहाय्यक 6एस्काई वरून बुकिंग करता येईल. तर इतर बुकिंग प्लॅटफॉर्मवर ही ऑफर ४ ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. मात्र ही सवलत केवळ १० ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ दरम्यानच्या प्रवासासाठीच लागू राहणार असून तिकीट बुकिंगच्या तारखेपासून किमान सात दिवसांनंतरचा प्रवास असणे आवश्यक आहे.


या सेलमध्ये कोची-चेन्नई, अमृतसर-श्रीनगर, मुंबई-छत्रपती संभाजीनगर, कोची-गोवा, दिल्ली-कानपूर, पुणे-सुरत, अहमदाबाद-दीव, कोची-कण्णूर, दीव-सुरत, देवघर-कोलकाता, चंदीगड-धर्मशाळा, कडपा-चेन्नई, चेन्नई-कडपा, हैदराबाद-सेलम आणि कडपा-विजयवाडा या मार्गांवर ₹१,२१९ पासून सुरू होणाऱ्या भाड्यांची सुविधा मिळणार आहे. याशिवाय सीट सिलेक्शन ₹१९ पासून, देशांतर्गत मार्गांवरील एक्सएल सीट ₹५०० पासून, प्रीपेड अतिरिक्त सामान आणि फास्ट फॉरवर्ड सेवांवर ५०% पर्यंत सवलत, 6E प्राईम आणि 6E सीट अँड ईट सेवांवर ३०% पर्यंत सवलत तसेच आंतरराष्ट्रीय मार्गांवरील झिरो कॅन्सलेशन प्लॅन ₹९९९ मध्ये उपलब्ध असेल.


मात्र ही ऑफर इंडिगोच्या इतर कोणत्याही योजना, प्रमोशन किंवा ऑफरसोबत लागू होणार नाही तसेच गट बुकिंगसाठीही ही सवलत लागू नाही, असे इंडिगोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या निमित्ताने ग्राहकांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ही ऑफर जाहीर करण्यात आल्याचे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, अलीकडेच इंडिगोची पालक कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडने २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ₹२,१७६ कोटींचा निव्वळ नफा जाहीर केला असून तो मागील वर्षाच्या तुलनेत २०.२ टक्क्यांनी घटलेला आहे.


Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते