लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबवण्यात आला असून सामन्याचा खेळ पाचव्या दिवसापर्यंत गेला आहे. इंग्लंडचा स्कोर ३३९ इतका झाला आहे. तर त्यांचे ६ विकेट पडले आहेत. जेमी आवर्टन आणि जेमी स्मिथ नाबाद आहेत. इंग्लंडला विजयासाठी ३५ धावा दूर आहे. तर भारताला चार विकेट हव्या आहेत. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.
सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात २२४ आणि इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात २४७ धावा केल्या. इंग्लंडचा पहिल्या डावाच्या आधारावर २३ धावांची आघाडी मिळवली होती. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३९६ धावांवर आटोपला.
असा होता इंग्लंडचा दुसरा डाव
धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरूवात चांगली राहिली. जॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. ही भागीदारी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने तोडली. खेळाच्या चौथ्या दिवशी बेन डकेट आणि ओली पोपने सांभाळत सुरूवात केली आणि दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावा केल्या. डकेटने अर्धशतक ठोकल्यानंतर तो प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलवर केएल राहुलच्या हाती कॅच देत बाद झाला. डकेटने ८३ बॉलमध्ये ५४ धावा केल्या.
भारताला चमत्कार वाचवणार का?
पाचव्या कसोटीचा खेळ पाचव्या दिवसापर्यंत गेला आहे. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. पाचव्या दिवशी चमत्कार होणार का? भारत हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवणार का? याचे उत्तर आता पाचव्या दिवशी मिळेल.
शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघासाठी हा सामना करो वा मरोचा आहे. इंग्लंडने या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने हा सामना गमावला तर मालिकाही गमवावी लागेल.