मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची सुरुवात एका वाईट बातमीने झाली आहे. मुंबईत अपघात झाला आहे.

अंधेरीहून वांद्र्याच्या दिशेने जात असलेली कार वाकोला पुलावर उलटली. कार उलटली आणि दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर जाऊन पडली. कारमध्ये चालकाच्या सुरक्षेसाठी एअरबॅग होती. ही एअरबॅग असल्यामुळे चालकाचा जीव वाचला. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. अपघातात जखमी झालेल्या सर्वांना वाकोला पोलिसांनी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघात ज्या ठिकाणी झाला तिथल्या दुभाजकाची तसेच रस्त्याची डागडुजी करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण या ठिकाणी सिग्नल किंवा अडथळा दर्शवणारे चिन्ह लावलेले नव्हते. याच कारणामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत.

Comments
Add Comment

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट

१५ दिवसांत तोडगा न निघाल्याने जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा

सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदत मुंबई : मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने मुनी