Saturday, August 2, 2025

जुहू समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली

जुहू समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली

मुंबई : जुहूच्या समुद्रात पोहोण्यासाठी गेलेली दोन अल्पवयीन मुले बुडाली. ड्युटीवर असलेल्या जीवरक्षकांनी एकाला यशस्वीरीत्या वाचवले, तर दुसरा मुलगा अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. ही घटना गोदरेज गेटजवळील सिल्व्हर बीचवर शुक्रवारी सकाळी घडली.


मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील जुहूच्या समुद्रात सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास दोन अल्पवयीन मुले बुडाल्याची माहिती मिळाली. ड्युटीवर असलेल्या जीवरक्षकांनी एकाला वाचवले.


मात्र, दुसरा मुलगा लाटेबरोबर समुद्रात खेचला गेला. घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, बीएमसीच्या के-पश्चिम वॉर्डचे अधिकारी आणि १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवा जुहू समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. मुलाच्या शोधासाठी युद्धपातळीवरील शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, त्यात गोताखोर, बचाव बोटी आणि समुद्रकिनाऱ्यावर तैनात करण्यात आली आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.A

Comments
Add Comment