Toyota Kirloskar: टोयोटा किर्लोस्‍कर मोटर्स विक्रीत जुलैत विक्रमी वाढ !

  45

जुलैमध्‍ये थेट ३२,५७५ युनिट्सची विक्री केली


गतवर्षीच्या तुलनेत जुलैमधील विक्रीत ३ टक्क्यांची वाढ


मुंबई: टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने (TKM) त्‍यांच्‍या विक्री कामगिरीची घोषणा केली. कंपनीने जुलै २०२५ मध्ये एकूण ३२ हजार ५७५ यूनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत या जुलैत त्यात ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यात देशांतर्गत विक्रीचे प्रमाण हे अंदाजे २९ हजार १५१ यूनिट्स तर निर्यात केलेल्या यूनिट्सचे प्रमाण ३४१६ इतके आहे. कंपनीने गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै या आर्थिक वर्षातील पहिल्या ४ महिन्यांच्या कालावधीत १०४८६१ युनिट्सची विक्री केली होती. यात यावर्षी १४ टक्क्यांची वाढ झाली असून समान कालावधीत ११९६३२ युनिट्सची विक्री नोंदवण्यात आली आहे. तसेच जानेवारी ते जुलै दरम्यान गतवर्षी १८१९०६ युनिट्सची विक्री करण्यात आली होती. यातही कंपनीने १४ टक्क्यांची वाढ नोंदवली असून यावर्षी या कालावधीत २०७४६० युनि ट्सची विक्री नोंदवली आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, टोयोटा ग्‍लॅन्‍झा आणि अर्बन क्रूझर हायरायडरसाठी विशेष लिमिटेड एडिशन प्रेस्टिज पॅकेजेससाठी बाजारपेठेतून प्रेरणादायी प्रतिसाद मिळाला आहे. त्याचा फायदा विक्रीच्या टक्केवारीवर दिसून आला आहे. तर दुसरीकडे, इनोव्‍हा हायक्रॉसला भारत एनसीएपीकडून प्रौढ व्‍यक्‍ती व लहान मुलांच्‍या सुरक्षिततेसाठी प्रतिष्ठित ५-स्‍टार सेफ्टी रेटिंग मिळाले. ज्‍यामुळे टोयोटाला सुरक्षितता नेतृत्‍वामधील मोठा टप्‍पा गाठता आला. टोयोटा ग्‍लॅन्‍झाच्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये प्रमाणित म्‍हणून भर करण्‍यात आलेल्‍या सहा एअरबॅग्‍ज ड्रायव्‍हर आणि प्रवाशांना सर्वसमावेशक संरक्षण देतात असे कंपनीने यावेळी आपल्या निवेदनात म्हटले आहे.


कंपनीच्या या यशाबाबत युज्‍ड कार बिझनेसच्‍या विक्री व सेवेचे उपाध्‍यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले की, 'आम्‍हाला जुलै २०२५ मध्‍ये ३ टक्‍के वाढीसह ३२,५७५ युनिट्सची विक्री करण्‍याचा आनंद होत आहे. एकूण, आमच्‍यासाठी बाजारपेठेत स्‍वीकृती सातत्‍यपूर्ण राहि ली आहे, ज्‍यामधून ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. बाजारपेठेला उच्‍च दर्जाची उत्‍पादने आणि सुधारित पोहोचच्‍या माध्‍यमातून मूल्‍यवर्धित सेवा देण्‍यावर आमची सतत लक्ष केंद्रित करू, जे आगामी महिन्‍यांमध्‍ये प्रमुख विकास स्रोत ठरतील, असा आमचा विश्वास आहे.'

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

टेस्ला मुंबईत पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करणार!

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाने घोषणा केली आहे की, त्यांचे भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन