ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद


डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे बारावे जलशुद्धीकरण केंद्रामधून मंगळवारी ५ ऑगस्टला ८ तासासाठी महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यावेळी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पाणी बंद ठेवण्यात येणार आहे.


ऐन पावसाळ्यात पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितल्यानुसार, पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण व्यवस्थेचे देखभाल दुरुस्तीचे काम पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यामुळे बारावे जलशुद्धीकरण केंद्रामधून नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा व पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या मांडा, टिटवाळा, बल्याणी, बनेली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि परिसरातील ग्रामीण भागातील काही गावे, याशिवाय कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग हद्दीतील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा कॉलनी परिसर, मुरबाड रस्ता, सिंडिकेट परिसराला होणारा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.


तर कल्याण पूर्व, डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. मंगळवारी दुरुस्तीच्या कामाच्यावेळी महावितरणकडून मोहिली जलशुध्दीकरण मीटर युनिट बसवण्यात येणार आहेत. तसेच दिवसभरात किती पाणी उचलले, शुध्द केले याची मोजणी या मीटरच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही अत्यावश्यक कामे मोहिली जलशुध्दीकरण केंद्रात करावयाची असल्याने मंगळवारी कल्याण शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.


आठ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Comments
Add Comment

ठाणे-बोरिवली भूमिगत रस्त्याच्या कामासाठी सहा महिने वाहतुकीत बदल

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरू झाले आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेचे इलेक्शन गणित ठरले! ९५ पैकी ४८ जागांवर महिलांना संधी

ओबीसीच्या २५ जागा; 'या' प्रभागांत दोन महिला नगरसेविका निवडल्या जाणार भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी

नवी मुंबईच्या निवडणुकीसाठी 'सीट फिक्स'! १११ पैकी ५६ जागांवर महिलांचे वर्चस्व

SC साठी ५, ST साठी १ जागा महिलांसाठी राखीव; इच्छुकांचे धाबे दणाणले! नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या (NMMC) आगामी

ठाण्यात 'आरक्षण लॉटरी' फुटली! कोणाचा पत्ता कट, कोणाला संधी?

३३ प्रभागांत १३१ नगरसेवक निवडले जाणार! ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांना ज्या क्षणाची उत्सुकता

ढोकाळीतील ५० वर्षे जुने मंदिर गायब!

तक्रार नोंदविण्यास पोलीसांची टाळाटाळ ठाणे  : ढोकाळी येथील हायलँड पार्क रोड येथे असलेले ५० वर्षे जुने कुलदैवताचे

मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी उद्या होणार सुनावणी, अभियंत्यांची चूक नाही असा वकिलांचा दावा!

ठाणे: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्यांबाबत मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी अटकपूर्व