
बेंगळुरू : माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने १ ऑगस्ट रोजी रेवण्णा यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर आता विशेष न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि १० लाखांचा दंड ठोठावला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर शिरीष गवस यांचं आज (दि.२) निधन ...
विशेष न्यायालयाने रेवण्णा यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(के) आणि ३७६(२)(एन) अंतर्गत ही शिक्षा सुनावली आहे. जन्मठेपेसह रेवण्णा यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच पीडितेला ७ लाख रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत. ही शिक्षा आजपासून लागू झाली आहे.
साडी, स्पर्म, बलात्कार अन् व्हिडीओ क्लिप्स…
प्रज्वल रेवण्णाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महत्त्वाचा पुरावा म्हणून एक साडी न्यायालयात सादर करण्यात आली होती. तसेच रेवण्णा यांनी मोलकरणीवर दोनवेळा बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडितेने या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता. तसेच तिच्याकडे जी साडी होती, त्या साडीवर तपासादरम्यान स्पर्म आढळले होते. त्यामुळे रेवण्णा यांच्याविरोधात सबळ पुरावा मिळाला आणि गुन्हा सिद्ध झाला
१२३ पुरावे हाती लागले
मोलकरणीच्या तक्रारीनंतर प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. म्हैसूरमधील केआर नगर मध्ये ही घटना घडली होती. याच्या तपासात CIDच्या विशेष तपास पथकाने सुमारे २००० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते, तसेच तपासादरम्यान अधिकाऱ्यांना एकूण १२३ पुरावे मिळाले होते. त्यामुळे आता मोलकरणीच्या बाजूने हा सकारात्मक निकाल लागला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला.