Friday, October 24, 2025
Happy Diwali

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात संभाजी देशमुख यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

यापूर्वीही संभाजी देशमुख यांना २०१६ मध्येही जाहीर झालेले राष्ट्रपती पदक राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते सन २०१८ ला देण्यात आले होते. २८ जुलै रोजी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सध्या राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत असलेल्या संभाजी नारायण देशमूख यांनी पोलीस दलामध्ये ठाणे शहर आयुक्तालय, अँन्टीकरप्शन विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई - कल्याण या प्रमुख ठिकाणी रश्मी शूक्ला, आशूतोष डूंबरे, श्रीकांत सावरकर, फत्तेसिह पाटील, छेरींग दोरजे, किशोर जाधव, दिपक साकोरे, संदिप जाधव, पराग मणेरे आदी वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनामध्ये उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे.

दुसऱ्यांदा मिळालेल्या मानाच्या राष्ट्रपती पोलीस पदकाबद्दल संभाजी देशमुख यांच्यावर पोलीस अधिकारी, शहरातील अनेक मान्यवर व्यक्तींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा