हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत जखमी केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी धारावी पोलीस ठाण्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीच्या फिर्यादीनुसार तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करत चौकशी करायला सुरुवात केली होती. मात्र या प्रकरणामधील आरोपी पसार झाला होता. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली.


ओळख लपवून सतत पोलिसांना गुंगारा देत असल्याने आरोपी पर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. आरोपी इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असल्याचे दिसताच पोलिसांनी मुलीच्या नावाने अकाउंट बनवून त्याला रिक्वेस्ट पाठवली. सुंदर मुलीचा फोटो बघून त्याने रिक्वेस्ट स्वीकारली. तिच्याशी काही दिवस चॅटिंग सुरू केले . तोपर्यंत पोलिसांनी माग काढत त्याच्या मुसक्या आवळल्या. मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार तेथील अंबड पोलिसांनी सिडको कॉलनीतून त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनीच इन्स्टाग्रामवरून रचलेल्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे लक्षात येताच डोक्यावर हात मारण्याची वेळ आरोपीवर आली.


शुभम कोरी १९ असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. धारावीत राहणाऱ्या शुभमचा एका तरुणाशी वाद झाला होता. तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून शुभम पसार झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजा बिडकर, पोलिस निरीक्षक अशोक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास शेलार व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. अटकेपासून वाचण्यासाठी शुभम मोबाइल वापरत नव्हता. सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. त्याने नातेवाईक, कुटुंबीयांसोबतचाही संपर्क तोडला होता.


पोलिसांनी त्याचा सोशल मीडियावरून पाठलाग सुरू केला. तो इन्स्टाग्रामवर सक्रिय असल्याचे समजताच पोलिसांनी तोच धागा पकडून तपासाला सुरुवात केली. सुंदर तरुणीच्या नावाने पोलिसांनी इन्स्टाग्राम खाते बनवून शुभमला रिक्वेस्ट पाठवली. त्याने मुलीची रिक्वेस्ट तत्काळ स्वीकारली. तिच्याशी चॅटिंग सुरू केले. तरुणीच्या मधाळ संवादात हरवून पोलिसांनी त्याचे नाशिकमधील लोकेशन शोधले. तेथील अंबड पोलिसांनी सिडको कॉलनीतून त्याच्या मुसक्या आवळल्या.


अचानक पोलिस धडकल्याने शुभम चक्कर येऊन कोसळला. त्याला लहानपणापासून फिट्स (मिरगी) येतात. पोलिसांनी त त्याला नाशिकच्या रुग्णालयात दाखल केले. मुंबईत घेऊन येत असताना त्याला पुन्हा चक्कर आली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना याबाबत सांगून त्याला सायन रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सदर आरोपीला लहानपणापासून फिट येण्याचा त्रास असल्याने अंबड पोलीस ठाणे, नाशिक येथे तशी नोंद घेण्यात आली. तसेच त्यावेळी त्याचा मोठा भाऊ अभिषेक मनोज कोरी, वय २४ वर्षे हा सोबत होता.

Comments
Add Comment

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या