मुंबई: भारतातील स्वदेशी संशोधन आणि विकासावर (Research and Development R&D) आधारित इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनी ओबेन इलेक्ट्रिक ५ ऑगस्ट २०२५ रोजी पुढील पिढीची रॉर्र ईझी (Rorr EZ) लाँच करणार आहे. कंपनीने या उ त्पादनावर बोलताना हे सुधारित मॉडेल, शहरातील इलेक्ट्रिक प्रवासाला एक नवीन धाडसी धार आणण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि पुनर्परिभाषित (Redifined) रायडर-केंद्रित वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत आणि त्याचबरोबर ते रॉर्र ईझीची फर्स्ट-फर्स्ट रचना आणि कामगिरी, विश्वासार्हता आणि व्यावहारिकता या त्याच्या मुख्य ताकदींशी सुसंगत आहे असे लाँचदरम्यान कंपनीने म्हटले आहे.
१५ ऑगस्ट २०२५ पासून बाजारातील बुकिंग सुरू
नवीन रॉर्र ईझीसाठीची बुकिंग लाँचच्या दिवशी सुरू होईल आणि डिलिव्हरी १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये लाँच झाल्यापासून, रॉर्र ईझी ही दैनंदिन प्रवासासाठी सर्वात पसंतीची इलेक्ट्रिक मोटरसायकल म्हणून उदयास आली हो ती. शहरी प्रवासासाठी निर्माण करण्यात आलेली ही इलेक्ट्रिक मोटरसायकल सहज हाताळणी, आकर्षक डिझाइन आणि उच्च-कार्यक्षमतायुक्त तंत्रज्ञान प्रदान करते.वास्तविक जगातील वाहतुकीच्या ताणांना थेट सहजपणे हाताळते, क्लच आणि गियर शिफ्टिंगची आवश्यकता दूर करून कंपन आणि उष्णता कमी करते असा कंपनीचा दावा आहे. कंपनीच्या माहितीनुसार, रॉर्र ईझी, १७५ किमी पर्यंतची आयडीसी रेंज देते, ४५ मिनिटांपासून ८०% पर्यंत जलद चार्जिंग पुरवते आणि ९५ किमी/तास या कमाल वेगापर्यंत पोहोच ते. या नवीन आगामी मॉडेलमध्ये ओबेनच्या मालकीच्या उच्च-कार्यक्षमता असलेल्या एलएफपी (LFP) बॅटरी तंत्रज्ञानाद्वारे सहाय्यित राहील, जे ५०% जास्त उष्णता प्रतिरोधकता (Heat Resistance) आणि दुप्पट आयुष्यासाठी ओळखले जाते.