एनएमएमटी बस कर्जत पूर्वेकडून सुटण्यास सुरुवात

शहरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार


विजय मांडे
कर्जत : कर्जत पूर्वेकडील प्रवाशांसाठी आात बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातून एनएमएमटी बस पूर्वेकडून सुटण्यास प्रारंभ झाला असून आता पूर्वेकडील प्रवाशांनाही पूर्वेकडून पश्चिमेकडचा प्रवास सुखकर होणार आहे.


नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने कर्जतच्या प्रवशांसाठी बसची सुविधा सुरू केली. या बस कर्जतच्या पश्चिम भागातून सुटत असल्याने प्रवाशांना अडचणीचे ठरत होते. याबाबत किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी नवी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि आज पासून या बस पूर्वेकडून अग्निशमन केंद्रापासून सुटण्यास सुरुवात झाली.


सकाळी १० वाजता या बस पूर्वेकडून सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचा शुभारंभ सोहळा कर्जत येथील अग्निशमन केंद्रा जवळ करण्यात आला होता. बस सोडण्याचा शुभारंभ किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नवी मुंबई परिवहनचे मुख्य वाहतूक अधिकारी सुनील साळुंखे, मुख्य नियोजन अधिकारी उमाकांत जंगले, सहाय्यक वाहतूक अधीक्षक धर्मराज भगत, श्रमिक सेना युनियन सरचिटणीस चरण जाधव, वाहतूक निरीक्षक बळीराम झुगरे, भानुदास पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक बजरंग परदेशी, अरविंद केदार, रमेश मुंढे, विजय बेडेकर, राजीव देशपांडे, शंकर थोरवे, मिनेश मसणे, कल्पना दास्ताने, शर्वरी कांबळे, स्मिता औरंगाबादकर, आदी उपस्थित होते. रमाकांत जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


यावेळी बोलताना सुनील गोगटे यांनी, 'आता प्रवाशांची गैरसोय खऱ्या अर्थाने दूर झाली असून, कर्जतकरांना चांगली सुविधा उपलब्ध झाल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबई परिवहन विभागाने अवघ्या पंधरा दिवसांत मागणी मान्य करूनही सुविधा प्रत्यक्षात आणली, असे स्पष्ट केले. कोरोना काळात ही सुविधा सुरु करण्यात आली. मात्र आता कर्जत शहरातील व परिसरातील प्रवाशांची चांगली सोय होऊन वेळ व पैसाही वाचणार असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.