Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

  114

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क


मुंबई:  शहरात गेली अनेक दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे साथीच्या आजारांनी देखील डोकं वर काढलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या साथीच्या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. शिवाय, नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.


पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने मच्छरवाढीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे, हेच या साथीमागील मुख्य कारण मानले जात आहे.


मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये घरात आणि आजूबाजूला साचलेलं पाणी हटवणं, मच्छरदाणीचा वापर, उकळलेलं पाणी पिणं, रस्त्यावरील अन्नपदार्थ टाळणं आणि ताप आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं अशा बाबींचा समावेश आहे.



मागील वर्षाच्या तुलनेत यंदा साथीच्या आजाराचे प्रकरण दुप्पटीने वाढले


मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अहवालानुसार, यावर्षी मलेरियाचे रुग्ण ४,१५१ पर्यंत पोहोचले आहेत, जे मागील वर्षी याच कालावधीत २,८५२ होते. डेंग्यूचे रुग्णदेखील ९६६ वरून १,१६० पर्यंत वाढले असून, फक्त जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यातच ४२६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कनगुनियाचे (Chikungunya Cases) प्रमाण देखील चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी फक्त ४६ रुग्ण होते, मात्र यावर्षी २६५ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ८६ रुग्ण फक्त मागील पंधरवड्यात आढळले आहेत.


याशिवाय, हॅपेटायटीस ए आणि ई या आजारांचं प्रमाण देखील वाढले आहे. जानेवारी ते जुलै २०२५ या कालावधीत हॅपेटायटीसचे ६१३ रुग्ण आढळले आहेत. लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिसचे प्रमाण काहीसे कमी झाले असले, तरी नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.



महानगरपालिकेकडून आरोग्यविषयक सूचना आणि ‘आपली चिकित्सा योजना’


महानगरपालिकेने ‘आपली चिकित्सा योजना’ पुन्हा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सामान्य रक्त तपासणी, लघवी तपासणी, ताप व संसर्गजन्य आजारांवरील चाचण्या कमी किमतीत उपलब्ध आहेत. तपासणीचे निकाल व्हॉट्सॲपवरही उपलब्ध होतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.



 
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही