EPFO: आता ईपीएफओचे पैसै काही मिनिटात काढा !

प्रतिनिधी: आता तुमच्या ईपीएफओ खात्यातून पैसे काढणे खूप सोपे होणार आहे. सगळ्या पूर्वीच्या क्लिष्ट प्रकिया व पैसे काढण्याची डोकेदुखी आता नष्ट होणार आहे. सरकारने तसा मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही आपल्या खात्यातील पैसे विनासायास का ढू शकाल. कामगार व रोजगार मंत्रालयाने संसदेत म्हटल्याप्रमाणे, आता तुम्ही आवश्यक प्रकिया पूर्ण केल्या असतील उदाहरणार्थ तुमचे पीएफ (Provident Fund PF) खाते आधार कार्डाशी जोडले असेल व बँक, पॅनशी जोडलेले असून ते अपडेट केले असल्या स खातेधारकाला लगेच पैसै काढणे शक्य होणार आहे.' जर ही प्रक्रिया पूर्ण असेल तर लगेच काही मिनिटात आपले पैसे आपल्या बँक खात्यावर जमा होणार आहेत असे निवेदन कामगार व रोजगार मंत्रालयाने संसदेत दिले आहे.

त्यामुळे अडीअडचणीच्या काळात व घरातील मोठ्या कार्याला या पैशातून खिश्याला आधार मिळू शकतो. याआधी आर्थिक वर्ष २०१७ मध्ये ईपीएफओ (Employee Provident Fund Organisation EPFO) ने कंपोझिट क्लेम फॉर्म चालू केला होता ज्यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना पैसे काढ ण्याची प्रक्रिया सोपी केली होती. आता मात्र विनाकारण त्रास न होता नव्या बदलांमुळे तुमचे पैसे तुमच्या गरजेला उपलब्ध असतील असे सरकारने स्पष्ट केले आहे. आता खातेधारक फक्त त्यांच्या घोषणेच्या आधारे पैसे काढू शकतात. पूर्वी, असे अनेक वेळा घडायचे की लोक बँक पासबुक किंवा चेकचे खराब दर्जाचे फोटो अपलोड करायचे, ज्यामुळे त्यांचे दावे नाकारले जात होते.

ही समस्या देखील आता दूर झाल्याने व्यवहार सोपा होऊ शकतो. मार्केट रिपोर्टनुसार, ३ एप्रिलपासून चेक किंवा पासबुकची प्रतिमा अपलोड करण्याची आवश्यकता दूर झाली आहे. यामुळे केवायसी आणि बँक खाते पडताळणीमधील समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. सरकारच्या माहितीनुसार,आतापर्यंत १.९ कोटींहून अधिक ईपीएफ खातेधारकांना या नवीन प्रक्रियेचा फायदा झाला आहे.ही संख्या २२ जुलै २०२५ पर्यंत आहे. ईपीएफओ दावे सोपे आणि विश्वासार्ह बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आम्ही उचलल्याचे सरकारने संसदेत खासदाराने विचारलेल्या प्रश्नावर स्पष्ट केले आहे.

आता लोक कोणत्याही कागदपत्रांच्या त्रासाशिवाय त्यांच्या गरजेच्या वेळी पैसे काढू शकतात. हा बदल विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत अडकले आहे आणि त्यांना त्वरित पैशांची आवश्यकता आहे. ईपीएफओचे हे पाऊल डिजिटल इंडिया आणि सरकारी प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. जर तुम्हीही तुमच्या ईपीएफ खात्यातून पैसे काढण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय ऑनलाइन प्रक्रिया सुरू करू शकता.
Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व

दोन्ही ठाकरेंपेक्षा एकट्या भाजपला अधिक जागा मुंबई - मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या एकुण जागांपेक्षा एकट्या भाजपाला

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी प्रभाग १ - रेखा राम यादव, शिवसेना प्रभाग २ - तेजस्वी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७