प्रतिनिधी: इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Payments Bank) आपल्या ग्राहकांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. आता ग्राहकांना आपल्या मोबाईलमधून डिजिटल बँकिंग व्यवहार करताना फिंगरप्रिंट अथवा बायोमेट्रिकची गरज लागणार नाही ते केवळ फेसव्हे रिफिकेशन (Face Authentication) आधारे पैसे ट्रान्स्फर करू शकतील. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी व्यवहार सोपा, सरळ, सुटसुटीत तसेच सुरक्षित होणार आहे. त्यामुळे हे मोठे पाऊल पोस्ट पेमेंट बँक (Post Payments Bank) उचलल्याचे म्हटले जाते.
सर्वाधिक फायदा दिव्यांग, वयस्कर ज्येष्ठ नागरिक यांना होणार असल्याचे बँकेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.या उपक्रमाविषयी बोलताना,'आयपीपीबीमध्ये, आमचा असा विश्वास आहे की बँकिंग केवळ सुलभ नसून सन्माननीय देखील असले पाहिजे.आधा र आधारित फेस ऑथेंटिकेशनसह, आम्ही बायोमेट्रिक फिंगरप्रिंट्स किंवा ओटीपी पडताळणीच्या मर्यादांमुळे कोणताही ग्राहक मागे राहणार नाही याची खात्री करत आहोत. मोठ्या प्रमाणात आर्थिक समावेशनाची पुनर्व्याख्या करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आ हे' असे आयपीपीबीचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर विश्वेश्वरन म्हणाले आहेत.
हे ओटीपी किंवा फिंगरप्रिंट सेन्सरवर अवलंबून न राहता आधार प्रमाणीकरण सुरक्षित करेल तसेच आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित बँकिंग सक्षम करेल, जिथे शारीरिक संपर्क धोकादायक असू शकतो, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.