PNB Housing Finance: कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान घसरगुंडी थेट १८% शेअर पडले 'या' कारणामुळे!

मोहित सोमण: पीएनबी हाउसिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स अखेरच्या सत्रात १८% कोसळले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कंपनीचे शेअर्स कोसळण्यामागे कंपनीच्या अंतर्गत घडामोडी जबाबदार ठरल्या आहेत.कंपनीचे सर्वेसर्वा व मुख्य कार्यकारी अधिका री व कार्यकारी संचालक गिरीश कौसगी यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीच्या शेअर गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. शुक्रवारी सकाळीच कंपनीचा शेअर ८३४ रूपयांवर उघडला गेला होता आता दुपारी ३ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १७.९३% कोसळला आहे. संपूर्ण दिवसभरात कंपनीचा शेअर १५ ते १७% किंमतीवर ट्रेड करत आहेत ज्याचा तोटा गुंतवणूकदारांना सहन करावा लागत आहे.


दुपारी ३ वाजेपर्यंत १७.९३% घसरण झाल्याने कंपनीच्या प्रति शेअरची किंमत ८०९ रूपयांवर पोहोचली आहे.मात्र 'गृहनिर्माण वित्त मंडळ लवकरच या पदासाठी शोध सुरू करेल. पीएनबी हाऊसिंग फायनान्सचा वारसा आणखी वाढवणारा नवीन नेता नियुक्त कर ण्यासाठी बोर्ड कठोर, पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रिया सुरू करेल. आम्हाला लवकरच एक योग्य व्यावसायिक निवडण्याचा विश्वास आहे, जो आमच्या धोरणात्मक दिशा आणि दीर्घकालीन मूल्य निर्मितीला आणखी गती देईल असे पीएनबी हा ऊसिंग फायनान्सच्या संचालक मंडळाच्या नामांकन आणि मोबदला समितीचे अध्यक्ष आर. चंद्रशेखरन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. याशिवाय कंपनीच्या दाव्यानुसार कंपनीची आर्थिक व संरचनात्मक परिस्थिती मजबूत स्थितीत आहे. कंपनीला कुठ ल्याही प्रकारचा धोका नाही. कौसगी यांनी कंपनीच्या उभारलेल्या यशस्वी व्यवसायाला कुठल्याही धोका नसून व्यवसायतील फोकस हा कायम राहणार असे कंपनीने म्हटले.


आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २३% वाढून ५३४ कोटी झाला होता. गृहनिर्माण वित्त कंपनी पीएनबीने मागील वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत ४३३ कोटींचा निव्वळ नफा (Net Profit) कमावला होता. या तिमाहीत कंपनीच्या एकूण उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत याच तिमाहीत १,८३२ कोटींवरून २०८२ कोटी रुपये उत्पन्न झाले आहे.या तिमाहीत व्याज उत्पन्न (Net Interest Income) जे गेल्या वर्षीच्य १,७३९ कोटींच्या तुलनेत १,९८० कोटी इतके वाढले. कंपनीचे सध्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) २१७२१.१८ कोटी रुपये आहे.

Comments
Add Comment

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा, पश्चिम रेल्वेची अवाजवी मागणी!

मुंबई : वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन पुलावरील डांबरी थर काढण्याचे काम पूर्ण झाले असून,