VI Finance: वी ने केले फायनान्स - कर्ज, गुंतवणूक आणि क्रेडिट कार्ड्स व्यवस्थापन सुलभ केले!

प्रतिनिधी: वी फायनान्सने (VI Finance) ने ग्राहकांच्या आर्थिक गरजा विनासायास पूर्ण करण्यासाठी आदित्य बिर्ला कॅपिटल, अपस्विंग फायनान्शियल टेक्नॉलॉजीज आणि क्रेडिलिओ यासारख्या संस्थांसोबत हातमिळवणी केली आहे. भारतातील आघाडीची टे लिकॉम कंपनी वी (वोडाफोन आयडिया) ने वी फायनान्स हा एक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म वी अँपपवर सुरु करत असल्याची घोषणा नुकतीच केली.ग्राहकांना कर्ज, मुदत ठेवी (FD) आणि क्रेडिट कार्ड्स (Credit Card) या सुविधा सहजपणे मिळवण्यात मदत करण्यासाठी वीने (Vi) हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंपनीने म्हटल्याप्रमाणे आता वी ऍपवरील उपयुक्त वैशिष्ट्ये आणि क्षमता अजून जास्त वाढल्या आहेत. विविध सेवासुविधांची पेमेंट्स, मुव्हीज आणि टीव्ही शो, गेमिंग, ईकॉमर्सवर खरेदीमध्ये सूट, क्विक कॉमर्स आणि इतर अनेक वेगवेगळ्या सेवा वी ऍपवर आधीपासून उपलब्ध आहेत.

जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या अनेक सेवासुविधा मिळण्याचे वन-स्टॉप सोल्युशन वी अँप बनावे या विचारावर आधारित वी फायनान्स हे विश्वसनीय आर्थिक संस्थांच्या सहयोगाने सुरु करण्यात आले आहे. व्यक्तिगत कर्ज, मुदत ठेवी आणि क्रेडिट कार्ड्स यासारख्या वेगवेगळ्या सुविधाजनक, सर्वसमावेशक व्यक्तिगत आर्थिक सुविधा प्रदान करणे हा त्यामागचा उद्देश आहे असे कंपनीने यावेळी नमूद केले आहे. ‌

वी चे सीएमओ अवनीश खोसला यांनी सांगितले,' डिजिटल सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांच्या जीवनात सुविधा आणण्यासाठी आम्ही वी मध्ये बांधील आहोत. वी ऍपमध्ये वी फायनान्समार्फत आर्थिक सेवासुविधा सहजपणे, जलद गतीने आणि उपलब्ध होण्याजोग्या आर्थिक सुविधा देऊन आम्ही ग्राहकांना नेहमीच्या गुंतागुंती न येता, त्यांचे फायनान्सेस नियंत्रणात ठेवता यावेत यासाठी सक्षम बनवत आहोत. विश्वसनीय आर्थिक संस्थांसोबत आमची भागीदारी असल्याने ग्राहकांना त्यांच्या गरजांनुरूप सुयोग्य उत्पादन मिळू शकेल हे नक्की. आम्ही असे मानतो की, हा डिजिटलला प्राधान्य देणारा, कागदविरहित दृष्टिकोन लाखो भारतीयांची फायनान्सेसचे व्यवस्थापन करण्याची पद्धत बदलेल.'



वी फायनान्समध्ये पुढीलप्रमाणे व्यक्तिगत फायनान्स सुविधा उपलब्ध आहेत -

व्यक्तिगत कर्ज: सोपे, जलद आणि तारणमुक्त (Without Mortgage)

वी फायनान्स,आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सहयोगाने ग्राहकांना व्यक्तिगत कर्ज अगदी सहज आणि सुरक्षित पद्धतीने उपलब्ध होतात.

५०००० रुपयांपासून पुढील किमतींच्या कर्जांसाठी ग्राहक अर्ज करू शकतात, व्याजदर देखील खूप आकर्षक आहेत, वार्षिक १०.९९% पासून पुढे.

ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि कागदरहित आहे, खूपच कमी डॉक्युमेंटेशन आणि सहजसोपे केवायसी आवश्यक असल्याने अचानक उद्भवणाऱ्या गरजेसाठी सुयोग्य आहे.

मुदत ठेवी (FD) : शून्य कागदपत्रे आणि ताबडतोब बुकिंग

अपस्विंग फायनान्शियल टेक्नॉलॉजीज (Upswing Financial Technology) या फिनटेक स्टार्टअपसोबत धोरणात्मक भागीदारी करून वी फायनान्सने अशी एक बाजारपेठ उपलब्ध करवून दिली आहे, जिथे विविध आघाडीच्या बँका आणि आर्थिक संस्थांचे उच्च व्याजदर देणारे फिक्स्ड डिपॉझिट पर्याय उपलब्ध आहेत.

ग्राहक कमीत कमी १००० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करून ८.४% टक्क्यांपर्यंत खात्रीशीर व्याज मिळवू शकतात, त्यामुळे लघुकालीन व दीर्घकालीन संपत्ती उभारणीसाठी चांगले आहे.

प्रति बँक ५ लाख रुपयांपर्यंतच्या एफडी डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनअंतर्गत (आरबीआयच्या संपूर्ण मालकीची उपसंस्था) कव्हर्ड आहेत.

क्रेडिट कार्ड्स: निवडीला पुरेपूर वाव

क्रेडिलिओच्या सहयोगाने, वी फायनान्सवर ग्राहकांना विविध आघाडीच्या बँका आणि आर्थिक संस्थांच्या क्रेडिट कार्ड्ससाठी अर्ज करता येतो. एसबीआय, ऍक्सिस बँक, एचडीएफसी इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.

या प्लॅटफॉर्मवर एफडी-बॅक्ड क्रेडिट कार्ड्स देखील आहेत, त्यामुळे लो क्रेडिट हिस्ट्री असलेल्या पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेत असलेल्या ग्राहकांना त्यांचा क्रेडिट प्रोफाइल उभारता येईल.

कॅशबॅक, डिस्काउंट, रिवॉर्ड पॉईंट्स आणि ईएमआय पर्याय यांचा लाभ घेऊन ग्राहक कागदपत्र जमा न करता किंवा या प्रक्रियेतील कोणत्याही पारंपरिक अडचणी न येता क्रेडिटची शक्ती अनलॉक करू शकतील.

वी फायनान्स हे आता वी ऍपवर सुरु झाले आहे. देशभरातील ग्राहकांना सुरक्षित, सोपा आणि एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळण्याचा अनुभव घेता येईल. गूगल प्ले स्टोर किंवा ऍपल ऍप स्टोरवरून वी ऍप डाउनलोड करता येईल.
Comments
Add Comment

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

गजा मारणे टोळीला धक्का, रुपेश मारणेला अटक

पुणे : गुंड गजानन उर्फ गज्या मारणेच्या टोळीतील रुपेश मारणेला पोलिसांनी अटक केली आहे. मारणे टोळीचा म्होरक्या

Thane News : ठाणे हादरलं! 'जीवंत सोडणार नाही' धमकी दिली अन् १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला... बंद घरात नेमकं काय घडलं?

ठाणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या १७ वर्षीय मैत्रिणीला पेटवून दिल्याचा अत्यंत