Ashish Shelar : नेटफ्लिक्सने मराठी कंटेंट क्रिएटर्स व मनोरंजन उद्योगासोबत भागीदारी करावी : मंत्री आशिष शेलार

सांस्कृतिक कार्य मंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन


लॉस एंजेलिस : मनोरंजर क्षेत्रातील आघाडीच्या ओटीटी प्लॅट फॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सने मराठी कंटेंट क्रिएटर्स व मनोरंजन उद्योगासोबत महाराष्ट्रात भागीदारी करावी, असे आवाहन महाराष्ट्र शासनातर्फे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड, आशिष शेलार यांनी आज येथे केले.


राज्याचा सांस्कृतिक मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ॲड आशिष शेलार यांनी मनोरंजन क्षेत्रातील विविध घटकांची मते जाणून घेतली होती तसेच शासनाकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षाही समजून घेतल्या होत्या. यावेळी झालेल्या विविध संवादामंध्ये त्यांनी मराठी चित्रपट, मालिका, वेबसिरिज आणि नाटक या क्षेत्रातील सर्वच घटकांशी संवाद साधला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी ला स्थान मिळत नाही अशी खंत त्यावेळी या क्षेत्रातील जाणकरांनी मंत्री शेलार यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यामुळे त्या दृष्टीने काही उपाययोजना करता येतील का याबाबत ते सध्या विविध पातळीवर काम करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी अमेरिका दौऱ्यात लॉस एंजेलिस येथे जाऊन नेटफ्लिक्स कॉर्पोरेशनच्या मुख्यालयाला भेट दिली.




 


या भेटीमध्ये ॲड शेलार यांनी नेटफ्लिक्सच्या जागतिक पातळीवरील "मोशन पिक्चर क्रिएटिव्ह वर्क पोर्टफोलिओचा" आढावा घेतला, ज्यामध्ये 'स्क्विड गेम्स'सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या कलाकृतींच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली. नेटफ्लिक्स करीत असलेले मनोरंजन क्षेत्रात काम व त्यातील नव्या संधी याचीही माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी नेटफ्लिक्ससह अन्य मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी ही संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्रात मराठी मध्ये कंटेंट क्रिएशन करावे असे आवाहन करतानाच शासन आपल्याला सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वस्त केले

Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त