Nitesh Rane : “नाक रगडून माफी मागा!”...मालेगाव निकालानंतर नितेश राणेंचा काँग्रेसवर घणाघात!

मुंबई : २९ सप्टेंबर २००८ साली रमजान महिन्यात मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जखमी झाले होते.यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणातील ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कोर्टाच्या या निकालानंतर मालेगावात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतंय. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. आता यावर मंत्री नितेश राणे यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.



'हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये'


नितेश राणे म्हणाले की, समाजाची बदनामी जी या मालेगावच्या प्रकरणातून करण्याचा प्रयत्न होता, त्यांना तोंडावर चपराक मिळाली आहे. त्यामुळे यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. परत परत एकच विषय सिद्ध होतोय की, आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे. कॉंग्रेसच्या काळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केस करण्यात आल्या, त्यांना अडकवण्यात आलं.हिंदुत्ववादी विचारसरणीचे राज्य आणि केंद्र सरकार असताना शक्य नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षेत आहे हे पुन्हा सिद्ध झालंय.



'नाक रगडून माफी मागितली पाहिजे'


पुढे बोलताना नितेश राणे यांनी म्हटले की, खरंतर या लोकांनी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे. यांनी मंदिरात जाऊन हिंदू समाजाची माफी मागावी. पुरावे यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. ते कोर्टात कोणतेही पुरावे सिद्ध करू शकले नाहीत. सर्व पद्धतीने हिंदू समाजाची बदनामी करणे हा कार्यक्रम कॉंग्रेसकडून चालू होता. आतंकवादाला ताकद देणे, जिहादला ताकद देणं हे त्यांचे सुरू होतं. ज्यांनी ज्यांनी यांची बदनामी केली, त्यांनी नाक रगडून माफी मागितली पाहिजे. या लोकांनी काही नसताना १७ वर्ष शिक्षा भोगली. त्यावेळीच्या कॉंग्रेस सरकारला हिंदू द्वेशच करायचं होतं, हे आपण बघतो. पाकिस्तानची भाषा आणि कॉंग्रेस पक्षाची भाषा एकच असते. आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी जे जे प्रयत्न करत आहेत त्यांची भाषा कॉंग्रेस आणि त्यांची लोक बोलत आहेत. यामुळे हे पुरावेच देऊ शकले नाहीत. खरोखरच भगवा दहशतवाद होता का? कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाची बदनामी करायची हे जे काही षडयंत्र होतं, ते हाणून पाडलंय, असेही नितेश राणे यांनी संतप्त वक्तव्य केलं आहे.


?si=pQT2nriKfkzheWGD

नेमकं काय झालं होतं ?


२९ सप्टेंबर २००८ साली रमजान महिन्यात झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जखमी झाले होते. मशिदी जवळ ठेवण्यात आलेल्या दुचाकीचा स्फोट झाला होता. याप्रकरणी भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तसेच मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आरोप आहेत. १९ एप्रिलला सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आरोपींना योग्य ती शिक्षा देण्याची मागणी एनआयएने केली होती. मालेगावात स्फोट घडवून मुस्लिम समाजात भीतीचं वातावरण पसरवून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याच कारस्थान असल्याचं एनआयएचं म्हणणं आहे. संपूर्ण गटात आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याचं एनआयए म्हणणं आहे. मालेगाव स्फोटांचा सुरुवातीचा तपास हा दहशतवाद विरोधी पथक एटीएस ने केला होता तर २०११ साली तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. ७ आरोपींवर आरोप निश्चिती केल्यानंतर २०१८ मध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. आरोपींवर युएपीए कायद्याच्या दहशतवादी कृत्य करणे आणि दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणे तसेच भारतीय दंड संहितेच्या हत्या, हत्येचा प्रयत्न तसेच धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने ३२३ साक्षीदार तपासले असून त्यातील ३७ साक्षीदार फितूर झाले. ज्या दुचाकीत स्फोटक ठेवण्यात आली होती ती साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची असल्याचा एटीएसचा दावा होता. २३ ऑक्टोबर २००८ मध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सुरू झालेल्या अटक सत्रात १४ नोव्हेंबर पर्यंत एकूण ११ जणांना अटक करण्यात आली. एटीएसने या प्रकरणी मोक्का लावला होता मात्र नंतर मोक्का मागे घेण्यात आला.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि