रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका हे 10 पदार्थ, आतड्यांना बसेल पीळ, हार्टपासून डायबिटीजपर्यंत होतील गंभीर आजार!

  122

सकाळची सुरुवात कशी होते, यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपली पचनसंस्था सर्वात संवेदनशील असते. त्यामुळे रिकाम्या पोटी काय खाल्ले जाते, याचा शरीरावर मोठा परिणाम होतो. जर तुम्ही रिकाम्या पोटी काही चुकीचे पदार्थ खाल्ले तर पित्त, अ‍ॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि चयापचय यांसारख्या अनेक समस्या सुरू होऊ शकतात.हे त्रास होऊ नये यासाठी आहारतज्ज्ञ रिकाम्या पोटी दहा पदार्थ खाऊ नका असा सल्ला देतात. जाणून घेऊ कोणते १० पदार्थ रिकाम्या पोटी खाऊ नये....


रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणे टाळा:


१ आंबट फळे: संत्री, मोसंबी किंवा अननस यांसारखी आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी वाढू शकते. या फळांमधील जास्त आम्ल पोटाच्या आतील आवरणाला त्रास देते, ज्यामुळे गॅस आणि जळजळ होऊ शकते.


२. टोमॅटो: टोमॅटोमध्ये टॅनिक अॅसिड असते, जे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी वाढवते. यामुळे पोटाचे त्रास वाढू शकतात आणि अल्सरचा धोकाही वाढतो.


३. केळी: केळी पौष्टिक असली तरी, रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीरातील मॅग्नेशियमची पातळी अचानक वाढू शकते. यामुळे हृदयावर परिणाम होण्याची शक्यता असते.


४. थंड पदार्थ: फ्रिजमधील थंड पाणी किंवा थंड रस रिकाम्या पोटी घेतल्यास पचनशक्ती कमी होते. थंड पदार्थांमुळे पचनक्रिया मंदावते आणि दिवसभर जडपणा वाटू शकतो.


५. गोड पदार्थ आणि साखर: सकाळी उठल्याबरोबर साखरयुक्त पदार्थ किंवा मिठाई खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे मधुमेह आणि मेटाबॉलिक विकारांचा धोका वाढतो.


६. चहा आणि कॉफी: रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास अ‍ॅसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते. चहामधील टॅनिक अॅसिड पोटाच्या आवरणाला त्रास देऊन पचनावर वाईट परिणाम करतो.


७. दही: रिकाम्या पोटी दही खाल्ल्यास त्यातील उपयुक्त जिवाणू पोटातील आम्लामुळे नष्ट होतात, ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.


८. मसालेदार आणि तेलकट पदार्थ: तळलेले किंवा मसालेदार पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटाच्या आतील आवरणावर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि पोटदुखी होऊ शकते.

९. कच्च्या भाज्या: कच्च्या भाज्या पचायला कठीण असतात. रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केल्यास गॅस, पोट फुगणे किंवा अपचनासारखे त्रास उद्भवतात.सकाळी रिकाम्या पोटी योग्य आहार घेण्याने पचन व्यवस्थित राहते आणि दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे दिवसाची सुरुवात हलक्या, पचायला सोप्या आणि पोषक अन्नाने करणेच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.


(टीप : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी प्रहार घेत नाही आणि कोणताही दावा करत नाही.)
Comments
Add Comment

Ganpati Arati : सुखकर्ता, दु:खहर्ता...! गणेशोत्सवात घर दुमदुमवणाऱ्या लोकप्रिय ५ आरत्या

१. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

Ganesh Chaturthi 2025 : पारंपारिक मोदकांना द्या हटके 'चॉकलेट मोदक'चा ट्विस्ट

मुंबई : यंदाच्या गणेश चतुर्थीला बाप्पासाठी काहीतरी खास बनवायची इच्छा असेल, तर पारंपरिक मोदकांना हटके 'चॉकलेट

Monsoon: पावसाळ्यात ओले कपडे सुकवताना दमछाक होतेय? 'या' सोप्या युक्त्यांनी मिळेल मदत

मुंबई : पावसाळ्याचा काळ सुरू झाला की, कपडे न सुकण्याची एक मोठी समस्या निर्माण होते. सततच्या पावसामुळे

हृदयविकाराचा इशारा देतात 'ही' लक्षणं – दुर्लक्ष केलं तर जीवावर बेतू शकतं !

मुंबई: आजकाल दिवसेंदिवस बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे. अनियमित झोप , बदलता आहार , कामाचा तणाव

WhatsApp New Feature : WhatsApp वर कॉलिंगची स्टाईल बदलणार! शेड्युलिंगपासून हँड रेजपर्यंत नवे फीचर्स लॉन्च

सध्याच्या काळात व्हॉट्सॲप हा सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग ॲप म्हणून ओळखला जातो. शाळेत जाणाऱ्या

केसांच्या वाढीसाठी रोझमेरी वॉटर की रोझमेरी ऑइल सर्वोत्तम आहे? योग्य पद्धत जाणून घ्या

मुंबई : आजकाल केस गळणे आणि कमकुवत होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी अनेक लोक