'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजारात 'धुमधडाका' सेन्सेक्स व निफ्टी सलग दुसऱ्यांदा उसळला काय आहेत कारण जाणून घ्या सविस्तर विश्लेषण....

  64

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळची वाढ संध्याकाळीही कायम राहिली आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स १४३.९१ अंकाने वाढत निर्देशांक ८१४८१.८६ पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी ५० निर्देशांक ३३.९५ अंकाने वाढ झाल्याने २४८५५. ०५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र अखेरच्या सत्रात ४०.४३ अंकाने व बँक निफ्टीत ७१.३० अंकाने घसरण झाली आहे.अखेरच्या सत्रात बँकेच्या निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे बाजारातील आणखी रॅली रोखली गेली. दुसरीकडे से न्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१७%,०.१७% वाढ झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अखेरच्या सत्रात अनुक्रमे ०.०७%, ०.५२% घसरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील पातळी पाहता आज संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी तुलनात्मकदृष्ट्या अधिक क्षेत्रीय समभागात घसरण झाली आहे. सर्वाधिक वाढ आयटी (०.३१%),एफएमसीजी (०.२४%), आयटी (०.३१%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.२५%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण रिअल्टी (०.९६%),मिडिया (०.७९%) ऑटो (०.६०%), मिडस्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (०.३१%) समभागात झाली.

आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का आजच स्पष्ट होईल. युएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल याविषयी आज पत्रकार परिषद घेऊन याविषयी भाष्य करू शकतात. सुरूवातीच्या कालखंडातील युएस मधील महागाई दर नियंत्रित दरात वाढले असले तरी मागील सीपीआय आकडेवारी समाधानकारक नव्हती. उद्या १ ऑगस्टला डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ वाढीसाठी अंतिम मुदत जाहीर केली आहे. त्यामुळे उद्या शेअर बाजारातही मोठी घडामोड अपेक्षित आहे.

दुसरीकडे युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २० ते २५% टेरिफ कर लावू शकतो असे म्हटल्यावर आज हेल्थकेअर, फार्मा, रिअल्टी,ऑट़ो,मेटल समभागात आलेल्या दबावामुळे या निर्देशांकात घसरण झाली. जागतिक बाजारपेठेचा विचार केल्यास आ जही अस्थिरतेची पातळी कायम होती.विशेषतः अखेरच्या सत्रात वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) २.७७% पातळीवर बंद झाला असला तरी ब्लू चिप्स कंपनीच्या समभागासह मिडकॅप समभागातही आज चढउतार कायम राहिली आहे. आजही बाजार घसरण्याची शक्यता होती मात्र आयटी समभागात अनपेक्षितपणे झालेल्या वाढीमुळे बाजार सावरण्यास गुंतवणूकदारांना मदत झाली. आजही गुंतवणूकदारांनी 'वेट अँड वॉच' पवित्रा कायम राखला. सातत्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूक दारांकडू न काढून घेत असलेली गुंतवणूक पाहता आजही तीच शक्यता कायम आहे. मात्र दुसरीकडे घरगुती गुंतवणूकदारांकडून बाजारात विश्वास राखत आपली गुंतवणूक कायम ठेवल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली.

जागतिक सोन्याच्या निर्देशांकात सकाळी वाढ झाली होती. ही प्रामुख्याने वाढ जागतिक भूराजकीय कारणांमुळे झाली होती. सकाळपर्यंत मागणीत व गुंतवणूकीत झालेल्या वाढीमुळे सोने वाढले होते. जागतिक बाजारपेठेत सोने स्थिरावले असले तरी भारतात आज रुपयांच्या घसरलेल्या मूल्यांकमुळे सोन्याच्या किंमतीला आधार मिळू शकला नाही.आज रूपया डॉलरच्या तुलनेत १८ ते २४ पैशाने दिवसभरात घसरला होता. अस्थि रतेत सोन्यात वाढत्या मागणीमुळे ईटीएफ गुंतवणूकीत झालेली वाढ हे सोन्यात वाढीसाठी महत्वा चे कारणे मानले जाते. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.०९% वाढ झाली होती. दुसरीकडे फेड दर कपातीतील अनिश्चितेसह युरोप व रशिया यांच्यातील रस्सीखेचीमुळे कच्च्या तेलाच्या मागणीत वाढ झाली होतई जी प्रामुख्याने ही वाढ स्पॉट डिमांडमध्ये झालेल्या वाढीमुळे झाल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात मात्र ०.८४% घसरण झाली होती तर Brent Future निर्देशांकात ०.८४% घसरण झाली होती.

मंगळवारी स्वीडनमध्ये अमेरिका-चीन चर्चा टेरिफ निश्चिती पूर्वीच संपल्यानंतर बुधवारी आशिया-पॅसिफिक बाजारांमध्ये आशियाई संमिश्र पातळीवर राहिला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या योजनेवर स्वाक्षरी करत नाहीत तोपर्यंत उच्च शुल्क स्थगित करणे अंतिम ठरणार नाही, असे अमेरिकन शिष्टमंडळाने प्रसारमाध्यमांना म्हटले होते. आशियाई बाजारातील प्रतिसाद संध्याकाळपर्यंत संमिश्र राहिला आहे. तैवान वेटेड (१.११%), कोसपी (०.७३%), शांघाई कंपोझिट (०.१७%), सेट कंपोझिट (०.८४%) बाजारात वाढ झाली आहे. तर हेंगसेंग (१.५२%),स्ट्रेट टाईम्स (०.२४%), जकार्ता कंपोझिट (०.९०%), निकेयी २२५ (०.११%) बाजारात घसरण झाली.  युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.११%) बाजारात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (०.३०%), नासडाक (०. ३८%) बाजारात घसरण झाली. तर सुरूवातीच्या कलात युरोपियन बाजारातही एफटीएसई (०.२४%) बाजारात घसरण तर सीएसी (०.४७%) डीएएक्स (०.२४%) बाजारात वाढ झाली आहे. बीएसईत आज ४१५८ समभागातील २०३० समभागात (Stocks) वाढ झाली असून १९६८ समभागात घसरण झाली. एनएसईत ३०५७ समभगापैकी १५०८ समभागात वाढ झाली असून १४६५ समभागात घसरण झाली.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ न्यू इंडिया ॲशुरन्स (१७.७७%), सुमिटोमो केमिकल्स (७.८६%), अव्हेन्यू सुपरमार्ट (७.०६%), क्राफ्टमन ऑटो (६.४४%), हिताची एनर्जी (५.२३%), स्टार हेल्थ इन्शुरन्स (४.९३%), जी ई व्हर्नोव्हा (५.००%), रेफेक्स इंडस्ट्रीज (९. ६८%), डीसीबी बँक (५.६७%), गो डिजिट इन्शुरन्स (२.८५%), शक्ती पंप (१.८०%), भारत बिजली (१.७९%) समभागात झाली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण रेडिंग्टन (७.०८%),झेन टेक्नॉलॉजी (५.००%), ब्लू डार्ट एक्स्प्रेस (४.७४%), टाटा मोटर्स (३.४५%), मदर्सन वायरिंग (३.०१%), स्विगी (३.०७%), बंधन बँक (२.०८%), होम फर्स्ट फायनान्स (२.९३%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (२.०७%),बंधन बँक (२.०८%), वोडाफोन आयडिया (२.६४%), बिर्ला कॉर्पोरेशन (८.४७%), रिलायन्स पॉवर (५.००%), रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (३.७६%), आरती ड्रग (३.१२%), मदर्सन (३.१०%), स्विगी (३.०७%), पिरामल फार्मा (२.०६%), डीएलएफ (१.४४ %), एलआयसी हाउसिंग फायनान्स (१.३५%) समभागात झाली.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'अलीकडील मोठ्या विक्रीनंतर बेंचमार्क निर्देशांकांनी सलग दुसऱ्या सत्रात त्यांचा सुधारात्मक टप्पा वाढवला. निफ्टी मजबूतपणे उघडला परंतु २४९०० अंकां च्या जवळ प्रतिकाराचा सामना करावा लागला, ज्यामुळे नफा बुकिंग सुरू झाली ज्यामुळे मध्य सत्रादरम्यान निर्देशांक २४७७२ पातळीच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. तथापि,उशिरा झालेल्या पुनर्प्राप्तीमुळे निर्देशांक तोटा कमी करून २४८५५ पातळी वर स्थिरावला. ३४ अंकांची किंवा ०.१४% ची माफक वाढ नोंदवली गेली. क्षेत्रीय आघाडीवर, मीडिया,ऑटो आणि रिअल्टी काउंटरमध्ये दबाव दिसून आला, जो ०.५% आणि १% च्या दरम्यान घसरला. उलट, आयटी आणि एफएमसीजी पॉकेट्समध्ये निवडक खरे दीची आवड दिसून आली, दोन्ही निर्देशांक किरकोळ हिरव्या रंगात संपले, (सुमारे ०.३%) व्यापक बाजार कामगिरी मंदावली,निफ्टी मिडकॅप १०० स्थिर राहिला, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० ०.५% ने घसरला जो सहभागींमधील अंतर्निहित (Underlying)सावधगि री दर्शवितो.'

आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' दैनिक स्टोकास्टिकवरील ओव्हरसोल्ड वाचनामुळे बुधवारी १०० दिवसांच्या ईएमए (Exponential Moving Average EMA) वरून जोरदार पुलबॅक झाल्यानंतर निर्देशांकाने एक लहान, बॉडीड मेणबत्ती (Bodied Candle) तयार केली ज्यामध्ये कमी सावलीचे संकेत एकत्रीकरण होते. पुढे जाऊन, येत्या सत्रांमध्ये निर्देशांक २४५००-२५००० पातळीच्या श्रेणीत एकत्रीकरण होईल. २५,००० पातळीच्या वर गेल्या २ आठवड्यां तील जवळजवळ समान उच्चांक असलेल्या २५२५० पातळीच्या प्रमुख प्रतिकार क्षेत्राकडे (Resistance Level) आणखी पुलबॅक उघडेल. मागील आवृत्त्यांमध्ये नमूद केल्याप्रमाणे, प्रमुख आधार २४६००-२४४०० क्षेत्रावर (Zone) ठेवण्यात आला आहे कारण तो मागील स्विंग लो, १०० दिवसांच्या ईएमए (EMA) आणि अलीकडील २३९३५ वरून २५६६९ पातळीपर्यंतच्या रॅलीच्या ६१.८% फिबोनाची रिट्रेसमेंट पातळीचा संगम ( Integration) आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' मासिक F&O समाप्तीपूर्वी स्टॉक विशिष्ट कृतींमुळे बँक निफ्टीने एक लहान बेअर कॅन्डल सिग्नलिंग कॉन्सोलिडेसन तयार केले. निर्देशांकाने अली कडेच ५६२०० -५६४०० पातळीच्या तात्काळ समर्थन क्षेत्राचा (Immediate Support Zone) टप्पा ओलांडला आहे, जो गेल्या दोन आठवड्यांतील जवळजवळ समान नीचांकी पातळीमुळे तयार झालेला अल्पकालीन मागणी आधार आहे. निर्देशांक यापेक्षा कमी राहिल्यास सुधारात्मक पूर्वाग्रह कायम राहील आणि नजीकच्या काळात ५५५०० अंकांपर्यंत घसरण वाढण्याची शक्यता आहे. ५५५००–५५००० क्षेत्र एक महत्त्वपूर्ण समर्थन क्लस्टर म्हणून उदयास येते, जे १०० दिवसांच्या EMA आणि मागील वरच्या हालचालीच्या प्रमुख फिबोनाची रिट्रेसमेंट पातळींशी जुळते ते उच्च-संभाव्यता मागणी क्षेत्र म्हणून अधोरेखित करते जिथे खरेदीदार पुन्हा प्रवेश करू शकतात, ज्यामुळे चालू घसरणीला अटक होऊ शकते.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'भारत-अमेरिका व्यापार करार आणि मिश्र उत्पन्नाभोवती सुरू असलेली अनिश्चितता असूनही, स्थानिक बाजाराने सत्रा चा शेवट किरकोळ सकारात्मकतेने केला. पहिल्या तिमाहीच्या निकालांवर आधारित गुंतवणूकदारांनी स्टॉक/सेक्टर स्पेसिफिककडे अधिक लक्ष केंद्रित केले; एल अँड टी कडून मिळालेल्या चांगल्या कमाईनंतर औद्योगिक क्षेत्राला गती मिळाली.टेरिफ-संबंधित दबावामुळे ऑटो क्षेत्राची कामगिरी कमी झाली. गुंतवणूकदार आता यूएस फेडच्या धोरण बैठकीवर लक्ष केंद्रित करत आहेत, कारण दर आणि चलनवाढीवरील त्यांची भूमिका जागतिक भावनांना आकार देऊ शकते.'

आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'भारत-अमेरिका व्यापार करार आणि मिश्र उत्पन्नाभोवती सुरू असलेली अनिश्चितता असूनही, स्थानिक बाजारा ने सत्राचा शेवट किरकोळ सकारात्मकतेने केला. पहिल्या तिमाहीच्या निकालांवर आधारित गुंतवणूकदारांनी स्टॉक/सेक्टर स्पेसिफिककडे अधिक लक्ष केंद्रित केले; एल अँड टी कडून मिळालेल्या चांगल्या कमाईनंतर औद्योगिक क्षेत्राला गती मिळाली. टेरिफ संबं धित दबावामुळे ऑटो क्षेत्राची कामगिरी कमी झाली. गुंतवणूकदार आता यूएस फेडच्या धोरण बैठकीवर लक्ष केंद्रित करत आहेत, कारण दर आणि चलनवाढीवरील त्यांची भूमिका जागतिक भावनांना आकार देऊ शकते.'

आजच्या बाजारातील एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,'निफ्टीने एका मर्यादित मर्यादेत व्यवहार केला, दैनंदिन कालावधीत तो ५० ईएमए (EMA) च्या खाली राहिला. निर्देशांक या गंभीर मूव्हिंग सरासरीपेक्षा खाली रा हिल्याने अल्पकालीन ट्रेंड थोडा कमकुवत राहिला आहे. तथापि, अर्थपूर्ण पुनर्प्राप्तीची शक्यता अबाधित आहे, ज्याला तेजीच्या उलट पॅटर्न निर्मिती आणि लपलेल्या सकारात्मक विचलनाचा आधार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, निर्देशांक अल्पावधीत २५०००- २ ५२०० पातळीच्या दिशेने वर जाऊ शकतो, ज्याचा आधार २४७५० पातळीवर आहे. या पातळीपेक्षा कमी ब्रेक बाजाराच्या भावना कमकुवत करू शकतो.'

आजच्या बाजारातील रुपयांवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलर निर्देशांकातील मजबूतीमुळे भावनेवर परिणाम झाला आणि रुपया ८७.४० पात ळीच्या पात ळीवर पोहोचला, तो ०.७२% घसरणीसह. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आज रात्रीच्या धोरण घोषणेपूर्वी बाजारातील सहभागी सावध राहिले आहेत, या आठवड्यात सादर केलेल्या अतिरिक्त प्रमुख अमेरिकन डेटामुळे अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. रुपया ८७.००-८७.७० च्या विस्तृत श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे.'

यामुळेच आजच्या ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणासह आगामी काळातील फेड निकाल, आगामी तिमाही निकाल, बँक निर्देशांकातील कामगिरी यावर बाजारातील पुढील दिशा स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरेंच्या घरी जाणार उद्धव ठाकरे

मुंबई : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत.

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण