अन्यायाविरुद्ध समविचारी संघटना एकवटल्या

  44

नाशिक येथे वज्रमुठ राज्यव्यापी दुसरी बैठक; मुख्यमंत्र्यांची आज घेणार भेट


नाशिक : सामाजिक,मराठा,शेतकरी आणि पुरोगामी विचारधारेच्या समविचारी संघटनांची वज्रमुठ राज्यव्यापी दुसरी बैठक नाशिकमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर चुकीचे गुन्हे दाखल करणे, सामूहिक जमाव करून प्राणघातक हल्ले तसेच राज्यातील वाढत्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन या संघटनांनी पुढील आंदोलनात्मक दिशा निश्चित करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची शिष्टमंडळ बुधवारी ( दिनांक ३०) रोजी भेट घेणार आहेत.


बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व मंत्री आणि आमदार यांचे दोन दिवशीय मार्गदर्शन शिबिर घ्यावे. त्यामध्ये राज्य शासन कसे चालवता याचे मार्गदर्शन करावे. कारण सध्या अनेक आमदार, मंत्री यांना जनसामान्यांचे सेवा करायची कशी याचा विसर पडल्या चे काही घटनांवरून दिसून येते. त्यामुळे


या शिबिरातून त्यांना त्याची जाणीव करून द्यावी ही मागणी प्रामुख्याने त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट संवाद आणि घटनात्मक मार्गाने न्याय मिळवण्यासाठी असणार आहे. मुख्य मंत्र्यांनी वेळ देण्याची एकमुखी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यांच्याकडून


वेळ मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. करण गायकर, सुभाष जावळे, महादेव देवसरकर, विलास पांगारकर,राजेश मोरे, राजू देसले, रामेश्वर शिंदे, प्रफुल वाघ, शिवा तेलंग , आशिष हिरे, विजय वाहुळे, योगेश कापसे, नवनाथ शिंदे, सुभाष गायकर, मनोरमा पाटील सविता वाघ प्रवीण पाटील दिनेश जाधव विजय उगले योगेश गांगुर्डे अश्विनी पाटील प्रताप भोसले भारत पिंगळे नितीन काळे मंगेश पाटील विकी गायधनी गणेश पाटील राहुल राऊत निलेश गायकवाड अमोल शिंदे शुभम महाले अमोल पाटील दादासाहेब जोगदंड नामदेव शिंदे आदी उपस्थित होते.


बैठकीतील ठराव असे...

  • जनसुरक्षा कायद्याप्रमाणे थोर महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कायदा तयार करावा.

  • मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा निषेधार्ह असून त्यामधील जे कोणी आरोपी होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

  • सरपंच कै.संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा आणि उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी.

  • इंद्रजित सावंत यांच्यावर केलेल्या शिवीगाळ प्रकरणात दोषींवर कायदेशीर कार्यवाही व्हावी.


लातूरमध्ये छावा संघटनेच्या शांततामय आंदोलनकर्त्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मारहाण निषेधार्ह असून,यामध्ये सुनील तटकरे यांच्या भूमिकेची चौकशी करावी.

 

 
Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून