JIO: जिओने लॉन्च केला एआय रेडी क्लाउड कॉम्प्युटर ‘Jio PC ’

टीव्ही स्क्रीनला स्मार्ट पीसीमध्ये रूपांतरित करा


कोणत्याही विशेष हार्डवेअरची आवश्यकता नाही


मासिक योजना 400 पासून सुरू


प्रतिनिधी: संगणक वापरण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओने आज ‘जिओ-पीसी’ हा नवीन क्लाउड-आधारित वर्च्युअल डेस्कटॉप प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. याच्या माध्यमातून तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये असलेली टीव्ही स्क्रीन काही क्षणांत हाय-एंड पर्सनल कॉम्प्युटरमध्ये रूपांतरित होऊ शकते. ज्यांच्याकडे जिओ फायबर किंवा जिओ एअर फायबर कनेक्शन आहे, त्यांना मासिक सब्स्क्रिप्शन घेऊन ही सेवा वापरता येईल. नवीन वापरकर्त्यांना हा अनुभव पहिल्या महिन्यासाठी मोफत दिला जाईल. क्लाउड कॉम्प्युटिंग क्षेत्रात जिओ-पीसी हे भारतातील पहिले ‘पे-एज-यू-गो’ मॉडेल आहे – म्हणजे जितका वापर तितकेच पैसे. या  सेवेसाठी कंपनीने कोणताही लॉक-इन कालावधी ठेवलेला नाही. ग्राहकांना मेंटेनन्स किंवा महागडे हार्डवेअर/सॉफ्टवेअर अपडेट करण्याची गरज नाही. फक्त प्लग-इन करा, साइन-इन करा आणि कॉम्प्युटिंग सुरू करा.


कंपनीचा दावा आहे की जिओ-पीसी एक शक्तिशाली क्लाउड-बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. याची प्रोसेसिंग क्षमता उच्च दर्जाची असून, हे डिव्हाईस गेमिंग, ग्राफिक रेंडरिंगसह दैनंदिन कामांसाठी सहजपणे वापरता येते. अशा क्षमतेचा संगणक बाजारात सुमारे ५०००० रूपयाला मिळतो, तर जिओ-पीसीची मासिक योजना फक्त ४०० पासून सुरू होते. म्हणजेच ग्राहक एका वर्षात मोठ्या प्रमाणात खर्च वाचवू शकतो. या सोबत वापरकर्त्यांना प्रमुख एआय टूल्स, अ‍ॅप्लिकेशन्स आणि ५१२ GB क्लाउड स्टोरेज मोफत दिले जाईल. ज गभरातील वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले ‘Adobe Express’ हे डिझाईन व एडिटिंग टूल जिओ-पीसी ग्राहकांसाठी पूर्णतः मोफत उपलब्ध असेल. यासाठी जिओने Adobe कंपनीसोबत भागीदारी केली आहे. जिओ-पीसी वापरणे अतिशय सोपे आहे.बहुतांश घरांमध्ये जिओ फायबर किंवा एअर फायबरचा सेट-टॉप बॉक्स आधीच टीव्हीला जोडलेला असतो. ग्राहकांना फक्त कीबोर्ड आणि माउस बॉक्सला जोडायचे आहेत. त्यानंतर मुख्य स्क्रीनवर ‘जिओ-पीसी अ‍ॅप’ उघडून लॉग-इन करा, आणि जिओ-पीसी वापरण्यास सुरुवात करा.


हे डिव्हाईस फक्त स्वस्तच नव्हे तर सुरक्षितही जिओ-पीसी सुरक्षित क्लाउड कॉम्प्युटिंगचा अनुभव देते. यामध्ये नेटवर्क स्तरावरील सुरक्षा आहे ज्यामध्ये व्हायरस, मॅलवेअर आणि हॅकिंगपासून संरक्षण मिळते. शॉपिंग, बँकिंग, ऑनलाईन क्लासेस, वर्क फ्रॉम होम, फोटो, व्हि डिओ अशा ग्राहकांच्या सर्व वैयक्तिक माहितीचे क्लाउडमध्ये सुरक्षित संग्रहण होते, जे एका क्लिकवर सहज मिळवता येते. ग्राहक आपली गरज आणि योजना यानुसार क्लाउड स्टोरेज वाढवू शकतो असे कंपनीने यावेळी म्हटले.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील