केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच…


विजय पाठक


जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण संस्था आणि वनविभागाच्या वतीने जागतिक व्याघ्र दिन २९ जुलैला साजरा करण्यात आला असला तरी मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात केळीच्या बागात राहणाऱ्या वाघांना आपली वेगळी ओळख देण्यात वनविभाग कमी पडले. अनेर मेळघाट कॉरिडॉर प्रकल्प १२ वर्षांपासून प्रलंबित असून यात वन खात्याची उदासीनता दिसून येते.


मुक्ताई-भवानी अभयारण्याची घोषणा चार वर्षांपूर्वी झाली असली तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत वनविभागाकडून पावले उचलली गेली नाहीत. या पार्श्वभूमीवर आज जळगाव आणि यावल वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीस जंगल वाचवा वाघ वाचवा घोषणा देत जळगाव येथून उत्साहात सुरुवात झाली.


उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या दोन दिवसांच्या रॅलीमध्ये राज्यभरातून आलेले १०० व्याघ्रदूत आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे २५ विद्यार्थी
सहभागी झाले.


रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना असून यावल वनविभागाकडून जंगल सफारीचा अनुभव देण्यात येणार आहे. नशिराबाद, भुसावळ, सावदा, फैजपूरमार्गे पाल या ठिकाणी पोहोचेल. रॅली दरम्यान वाघ वाचवा, जंगल वाचवा; असा संदेश देत विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी पथनाट्य सादर केले. जंगलाच्या प्रतिकृतीसारख्या सजवलेल्या सफारी वाहनावर उभे असलेले दोन मानवी वाघ विशेष आकर्षण ठरले.


महाराष्ट्रातील वाघ संवर्धनात जळगाव जिल्ह्याचा वाटा आहे. विशेषतः यावल प्रादेशिक वनविभागात २०११ नंतर पुन्हा वाघ दाखल झाला. मेळघाटातून वाघ वाघदऱ्या, वढोदा रेंजमार्गे स्थलांतर करून यावलच्या जंगलात येतो, हे आता सिद्ध झाले. २०२४ मध्ये ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्टपणे वाघाचे दृश्य नोंदवले गेले. २०२५ मध्ये गौताळा-ऑट्रामघाट परिसरातही अशाच प्रकारच्या वाघाच्या उपस्थितीचे दाखले मिळाले.


असे असले तरी रावेर मुक्ताईनगर तालुक्यात केळाच्या बागात प्रजननासाठी येणारे वाघ यांना संरक्षण नाही केळाच्या बोत गारवा आणि लपण्यासाठी जागा असल्याने या वाघांना बनााना टायगर संबोधले जाते.आज जिल्हयात आठ ते नउ वाघ असल्याचे व्याघ्र अभ्यासक अभय उजागरे राजेंद्र नन्नवरे सांगतात.

Comments
Add Comment

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या ६६ किमी परिक्रमा मार्गाला ‘हिरवा कंदील’

भूसंपादनासह रस्त्याच्या उभारणीकरिता सात हजार ९२२.११ कोटी रुपयांचा निधी मंजूर नाशिक (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ

नाशिकमध्ये आफ्रिकन स्वाईन फिव्हरची नोंद, प्रशासन अलर्ट मोडवर!

मुंबई : नाशिक शहरात आफ्रिकन स्वाईन फिव्हरचा प्रादुर्भाव आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील एका मृत

नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात बस थेट फलाटावर धडकली अन्... ९ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू तर ५ जण जखमी

नाशिक : नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात घडलेल्या भीषण अपघातात एका ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले

राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार; शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढणार?

सुजय विखे पाटील यांनी जागा देऊनही शिवसेना-भाजपने आम्हाला डावलले - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल

Nashik Crime Bhondu Baba : 'शरीरसंबंध ठेव नाहीतर... बळी जाईल!' मांत्रिकाने महिलेला दिली 'घरातील व्यक्तीच्या मृत्यू'ची धमकी; १४ वर्षे लैंगिक अत्याचार!

नाशिक : नाशिक शहर पुन्हा एकदा फसवणुकीच्या आणि सामाजिक गुन्हेगारीच्या एका गंभीर घटनेने हादरले आहे. इंदिरा नगर

शिउबाठाला मोठे खिंडार! नाशिकच्या अद्वय हिरेंची घरवापसी, भाजपच्या मुंबईतील कार्यालयात होणार पक्षप्रवेश

नाशिक: महाराष्ट्राच्या राजकारणात आज अजून एक पक्षांतर होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या