संबंधित प्रतिकिया ट्रम्प यांनी पाच दिवसीय स्कॉटलंड दौऱ्यातून परतताना दिली. युएसला जगभरातील व्यापारी धोरणात सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे असा पवित्रा त्यांनी यावेळी घेतला होता. दरम्यान टेरिफ शुल्कवाढ २ एप्रिल २०२५ रोजी घोषित करत ते ९ जुलै २०२५ पासून लागू होणार होते. तथापि आयात शुल्क लागू करण्याची अंतिम मुदत नंतर १ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली. नुकत्याच करारात अमेरिकेने आतापर्यंत यूके, इंडोनेशिया, फिलीपिन्स, युरोपियन युनियन आणि जपानसोबत यशस्वी डील (Tariff Deal) केले होते.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, 'तात्पुरत्या उपाययोजना म्हणून निवडक निर्यातींवर २०% ते २५% पर्यंत जास्त कर लावण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी दिल्ली पुढील तयारी करत आहे. नवीन सवलती देण्याऐवजी, भारत ऑगस्टच्या मध्यात अमे रिकन शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान व्यापक व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे.' यापूर्वी शिष्टमंडळाने ट्रम्प प्रशासनाची भेट घेत बोलणी केली होती. मात्र त्यावर अपेक्षित बोलणी न झाल्याने हाती निराशाच आली.
आता पुढील घडामोडींवर बो लतांना सुत्रांनी सांगितले की,' चर्चा चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत एक शिष्टमंडळ दिल्लीत येण्याची अपेक्षा आहे.'. याखेरीज पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक युद्धात 'मी' पुढाकार घेतल्याने युद्धबंदी झाली असे ट्रम्प यांनी म्हणत स्वतः ची खुशामत यानिमित्ताने केली.