मुंबईकरांची तहान भागविणा-या सातही धरणात मुबलक पाणीसाठा

  47

धरणांतील पाणीसाठा ८८.३८ टक्क्यांवर


मुंबई (वार्ताहर) : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझीम सुरू असून तानसा आणि मोडकसागर यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत. सातही धरणांमधील पाणीसाठा हा ८८.३८ टक्क्यांवर पोहोचला असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे.


मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये प्रतिदिन ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मार्च-एप्रिलमध्ये सातही धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभाग चिंताग्रस्त होता. मात्र पावसाने मे महिन्यामध्ये दमदार हजेरी लावल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.


सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे. जलअभियंता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २९ जुलै रोजी सकाळी ६ च्या नोंदीनुसार उर्ध वैतरणामध्ये ३७ मिमी, मोडकसागरमध्ये ३८ मिमी, तानसामध्ये १६ मिमी, मध्य वैतरणामध्ये ४० मिमी, भातसामध्ये २२ मिमी, विहारमध्ये ६ मिमी, तुलशीमध्ये ३५ मिमी. पावसाची नोंद झाली. या सातही धरणांमधील वापरायोग्य पाण्याची पातळी अनुक्रमे ८१.८९, १०० टक्के, ९८.४१ टक्के, ९५.९५ टक्के, ८५ टक्के, ७१.०९ टक्के आणि ८०.२७ टक्के इतकी आहे.



मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठी अधिक


सातही धरणांमध्ये आता ८८.३८ टक्के म्हणजे १२ लाख ७९ हजार १७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी (२०२४) याच दिवशी धरणांमध्ये ७३.७७ टक्के म्हणजेच १० लाख ६७हजार ७०३ दशलक्ष लिटर, तर २०२३ मध्ये याच दिवशी ७१.८४ टक्के म्हणजे १० लाख ३९ हजार ८२५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. सातही धरणांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई