Tuesday, August 19, 2025

मुंबईतील 'या' भागात १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

मुंबईतील 'या' भागात १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद
मुंबई : पाली हिल जलाशयाच्या इनलेट व आऊटलेट वरील एकूण ४ झडपा (व्हॉल्व्ह) बदलण्याचे कामकाज बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. गुरुवार ३१ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत एकूण १४ तास हे काम सुरु राहणार आहे. या कालावधीत एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

अ) कामकाजाच्या दरम्यान पाणीपुरवठा खंडित -


१. पाणीपुरवठा परिक्षेत्र : हनुमान नगर, लक्ष्मी नगर युनियन पार्क मार्ग क्रमांक १ ते ४, पाली हिल आणि च्युईम गावाचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० वा.) (पाणीपुरवठा बंद राहणार)

२. पाणीपुरवठा परिक्षेत्र : नर्गिस दत्त मार्ग, पद्मश्री देव आनंद मार्ग (जिग जॅग मार्ग) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - रात्री १०.०० ते मध्यरात्री १.०० वा.) (पाणीपुरवठा बंद राहणार)

३. पंप परिक्षेत्र २ : नर्गिस दत्त मार्ग, पाली माला मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० वा.) (पाणीपुरवठा बंद राहणार)

ब) कमी दाबाने पाणीपुरवठा -


१. पेरी परिक्षेत्र : कांतवाडी परिसराचा काही भाग, पाली नाका, पाली गावठाण, शेरली, राजन व माला गावाचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा.) (कमी दाबाने पाणीपुरवठा)

२. खारदांडा परिक्षेत्र : खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युईम गावठाण, गझधरबंध झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ५.३० ते रात्री १०.०० वा.) (कमी दाबाने पाणीपुरवठा)

कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments
Add Comment