Video : गौतम गंभीर आणि ओव्हल मैदानाच्या क्युरेटरमध्ये जोरदार वादावादी

लंडन : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हलचे पिच क्युरेटर यांच्यात वाद झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, या प्रकरणाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ३१ जुलैपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे. टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवून मालिकेचा शेवट २-२ असा बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.


सराव दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये गंभीर संतप्तपणे क्युरेटरशी वाद घालताना दिसत होता. त्यानंतर भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांना हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करावी लागली. दोघांमध्ये हा वाद का झाला हे स्पष्ट नसले तरी, गंभीर आणि फोर्टिस सरावासाठी खेळपट्ट्यांच्या स्थितीवरून वाद घालताना दिसले. त्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक कोटक यांनी हस्तक्षेप केला आणि फोर्टिसला सराव मैदानाच्या एका कोपऱ्यात घेऊन गेले. त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर फोर्टिस आणि गंभीर आपापल्या मार्गाने गेले आणि भारतीय प्रशिक्षक नेट सत्राचे निरीक्षण करण्यासाठी परतले.


 


शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय संघामध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम केले. त्याआधी गंभीरने संघाच्या कामगिरीबद्दल सांगितले की, आम्ही उत्कृष्ट खेळलो आहोत. गंभीर पुढे म्हणाला, जेव्हा जेव्हा आम्ही इंग्लंड दौऱ्यावर जातो तेव्हा आम्हाला मिळालेल्या प्रत्येक पाठिंब्याची आम्ही कदर करतो. गेल्या पाच आठवड्यांमध्ये दोन्ही देशांसाठी खरोखरच रोमांचक कामगिरी झाली आहे. ज्या प्रकारचे क्रिकेट पाहिले गेले. मला खात्री आहे की, ते क्रिकेटप्रेमींना अभिमानास्पद वाटले असेल.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत