राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार

मुंबई : राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच या अभियानातील पुरस्कारांकरिता दरवर्षी २९० कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली.


या अभियानात 1 हजार 902 पुरस्कार दिले जाणार असून अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर, ते 31 डिसेंबर, 2025 असा राहणार आहे. ग्रामपंचायतीसाठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी 5 कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3 कोटी रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 2 कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर विभागस्तरीय पुरस्कारात विभागनिहाय पहिल्या 3 ग्रामपंचायती अशा एकूण 18 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 1 कोटी, 80 लाख आणि 60 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. जिल्हास्तरासाठी 34 जिल्ह्यातील एकूण 102 ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी 50 लाख, द्वितीयसाठी 30 लाख आणि तृतीयसाठी 20 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर (1053 पुरस्कार) ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकासाठी 15 लाख, द्वितीय क्रमांकासाठी 12 लाख, तृतीय क्रमांकासाठी 8 लाख रुपये अशा एकूण 1 हजार 53 ग्रामपंचायती आणि 5 लाख रुपयांचे दोन विशेष पुरस्कार (702 पुरस्कार) देण्यात येणार आहेत.


पंचायत समितीसाठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी 2 कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी दीड कोटी रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 1 कोटी 25 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर विभागस्तरावर (18 पुरस्कार) प्रथम क्रमांकासाठी 1 कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 75 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 60 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.


जिल्हा परिषदेसाठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी 5 कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3 कोटी रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 2 कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.


या अभियानाच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी राज्यस्तरावर ग्रामविकास व पंचायतराज मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 16 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या अभियानाची पूर्वतयारी 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या अभियान पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर मूल्यमापनासाठी समित्या स्थापन करण्यात येतील. तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी विभाग, जिल्हा व पंचायत समिती स्तरावर संनियंत्रण व मूल्यमापन यंत्रणा समिती काम करणार आहे. या अभियांनाच्या प्रत्येक टप्प्यावरील मूल्यमापनासाठी कार्यपध्दती व वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.


या अभियानात सात मुख्य घटक आहेत. यात सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांची सांगड, गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ अशा घटकांचा समावेश आहे. या घटकांच्या आधारे गुणांकन करुन पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.

Comments
Add Comment

पुण्यातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार

ब्रिटनस्थित ‘टी४ एज्युकेशन’ संस्थेने जालिंदरनगर (ता.खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘२०२५

What is E-Bond : आजपासून 'कागदी बाँड' हद्दपार! महसूलमंत्र्यांच्या निर्णयामुळे ई-बॉण्डची एन्ट्री; वाचा काय आहे ई-बॉण्ड?

मुंबई : महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला

दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाण्यात वाहन खरेदीचा उत्साह, आरटीओमध्ये ४ हजार २२६ वाहनांची नोंदणी

caठाणे (वार्ताहर) : शहरभर नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने धाव

गणपतीपुळे संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी ४२ लाखाची मदत

रत्नागिरी : श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थानकडून मराठवाड्यातील महापुरातील नुकसानग्रस्तांकरिता ४२ लाखाची मदत

'ठाकरें'ना दसऱ्यालाच मोठा झटका! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, कोकणातील नेता शिंदे गटात दाखल

दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश मुंबई: शिवसेना (उद्धव

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा